Top MBBS College : गेल्या महिन्यात म्हणजे मे महिन्यात NEET UG ची परीक्षा झाली. चार मे रोजी संपूर्ण देशभरात नीट UG ची परीक्षा आयोजित करण्यात आली होती. आता परीक्षार्थी या परीक्षेच्या निकालाची वाट पाहत आहे. जर तुम्हीही ही परीक्षा दिली असेल किंवा पुढील वर्षासाठी तयारी करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी फारच महत्त्वाची आहे.
जसं की आपणास ठाऊकच आहे की वैद्यकीय शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्या अनेक उमेदवारांची स्वप्न हे MBBS डॉक्टर होण्याचे असते. मात्र, एमबीबीएस बनवणे जेवढे दिसते तेवढे सोपे नाही,

या शिक्षणासाठी लागणाऱ्या खर्चामुळे अनेकांना इच्छा असून सुद्धा एमबीबीएस डॉक्टर होता येत नाही. जर समजा आटापिटा करून एमबीबीएस ला ऍडमिशन घेतले तर काही प्रसंगी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो.
म्हणूनच विद्यार्थ्यांकडून कमी खर्चात एमबीबीएस चे शिक्षण कोणत्या कॉलेजमध्ये होऊ शकते असा प्रश्न उपस्थित होतो. अशा वेळी आज आपण कमी खर्चात उच्च दर्जाचे वैद्यकीय शिक्षण देणारे कॉलेज कोणते? याचा आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
हे आहे देशातील सर्वाधिक स्वस्त मेडिकल कॉलेज
देशातील सर्वाधिक स्वस्त मेडिकल कॉलेज म्हणून AIIMS दिल्लीला ओळख प्राप्त झाली आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील हे मेडिकल कॉलेज उमेदवारांसाठी एक उत्तम पर्याय ठरते.
हे सरकारी कॉलेज असून AIIMS दिल्ली हे भारतातील सर्वात स्वस्त MBBS कॉलेज सुद्धा मानले जाते. येथे शिक्षणासाठी लागणारे एकूण वार्षिक शुल्क 6 हजार रुपयांपेक्षा कमी असल्याची माहिती मीडिया रिपोर्ट मधून समोर आली आहे.
या वार्षिक शैक्षणिक शुल्कात शिक्षण शुल्क, वसतिगृह भाडे, विद्युत शुल्क, प्रयोगशाळा शुल्क, विद्यार्थ्यांची युनियन फी, जिमखाना शुल्क आदींचा समावेश आहे.
या कॉलेजमध्ये एमबीबीएस साठी शिक्षण आणि इतर शैक्षणिक शुल्क सुमारे 1628, तर वसतिगृह आणि अन्य संबंधित शुल्क मिळून एकूण 4228 इतका खर्च येतो. याशिवाय काही रक्कम रिफंडेबल स्वरूपात सुद्धा घेतली जाते. म्हणजेच येथून विद्यार्थ्यांना अवघ्या काही हजारात एमबीबीएस चे शिक्षण घेता येणार आहे.
AIIMS दिल्ली आहे नंबर 1 कॉलेज
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, NIRF रँकिंग 2024 मध्ये या कॉलेजची ऑल इंडिया रँकिंग 1 आहे. हे देशातील अव्वल क्रमांकाचे मेडिकल कॉलेज म्हणून ओळखले जात आहे. त्यामुळे कमी खर्चात दर्जेदार शिक्षण हवं असेल तर या कॉलेजचा पर्याय तुमच्यासाठी सर्वात बेस्ट ठरणार आहे.
पण या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवायचे असेल तर तुम्हाला NEET UG परीक्षेत चांगले गुण मिळायला हवेत. या परीक्षेत चांगले गुण मिळाले तरच तुम्हाला AIIMS मध्ये प्रवेश मिळणार आहे.