‘ही’ आहेत महाराष्ट्रातील टॉप 5 गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज ! इथं ऍडमिशन मिळालं म्हणजे लाईफ सेट

बारावी सायन्स नंतर अनेक विद्यार्थी एमबीबीएसला प्रवेश घेण्याच्या तयारीत आहेत आणि या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षा सुद्धा दिलेली आहे. दरम्यान जर तुम्हीही MBBS ला ऍडमिशन घेण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आज आम्ही महाराष्ट्रातील टॉप 5 सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांची माहिती घेऊन हजर झालो आहोत.

Published on -

Top Medical College : भारतात मेडिकल आणि इंजीनियरिंग ला ऍडमिशन घेणाऱ्यांची संख्या फारच अधिक आहे. दरम्यान जर तुम्हीही बारावी सायन्स पास आऊट झाल्यानंतर मेडिकल कॉलेजला ऍडमिशन घेण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे. कारण की आज आपण महाराष्ट्रातील टॉप पाच गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज ची माहिती पाहणार आहोत.

आज आपण अशा गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजची माहिती पाहणार आहोत जिथे तुम्हाला ऍडमिशन मिळालं म्हणजे तुमची लाईफ कायमची सेट होणार आहे. या मेडिकल कॉलेजमध्ये कमी खर्चात एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण करता येणार आहे आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना चांगल्या पगाराची नोकरी सुद्धा लागणार आहे.

ही आहेत महाराष्ट्रातील टॉप पाच गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, गेल्या महिन्यात म्हणजेच मे महिन्यात नीट युजीची एक्साम घेण्यात आली होती. चार मे रोजी ही एक्झाम घेण्यात आली आहे आणि आता लवकरच याचा रिझल्ट सुद्धा डिक्लेअर होणार आहे. दरम्यान रिझल्ट डिक्लेअर झाल्यानंतर विद्यार्थ्यांची ऍडमिशन प्रोसेस स्टार्ट होईल. अशा परिस्थितीत आता आपण राज्यातील टॉप पाच गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजची माहिती पाहूयात.

1) लोकमान्य टिळक म्युन्सिपल मेडिकल कॉलेज मुंबई : देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्र राज्याची राज्य राजधानी मुंबईतील हे कॉलेज सर्वाधिक जुने वैद्यकीय महाविद्यालय म्हणून ओळखले जाते. या कॉलेज बाबत बोलायचं झालं तर याची स्थापना 1964 मध्ये झाली होती.

जर तुम्हाला मुंबईमधून वैद्यकीय शिक्षण घ्यायचे असेल तर तुमच्यासाठी या महाविद्यालयाचा पर्याय बेस्ट राहणार आहे. या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांसाठी एमबीबीएस, रेडिओग्राफिक टेक्निशियन, ऑपरेशन थिएटर टेक्निशियन, कार्डिओलॉजी टेक्निशियन, ऑक्युपेशनल थेरपी, फिजियोथेरेपी असे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.

2) बी. जे मेडिकल कॉलेज पुणे : तुम्हाला एमबीबीएस करायचे असेल तर तुमच्यासाठी पुण्यातील या कॉलेजचा पर्याय सर्वोत्कृष्ट राहील. हे महाराष्ट्रातील एक टॉपचे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी एमबीबीएसचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे.

यासोबतच पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी, नर्सिंग असे विविध अभ्यासक्रम या कॉलेजमध्ये आहेत. नक्कीच वैद्यकीय क्षेत्रात करिअर घडवायचे असेल तर हे कॉलेज तुमच्यासाठी बेस्ट राहणार आहे. इथून डिग्री कम्प्लीट केल्यानंतर तुम्हाला चांगल्या पगाराची नोकरी मिळणार आहे.

3) सेठ जीएस मेडिकल कॉलेज, मुंबई : हे देखील महाराष्ट्रातील एक प्रतिष्ठित मेडिकल कॉलेज आहे. या मेडिकल कॉलेजची स्थापना 1925 मध्ये झाली असून इथे एमबीबीएससाठी 250 जागा उपलब्ध आहेत.

या कॉलेजमध्ये एमबीबीएस सोबतच इतरही अन्य अभ्यासक्रमांचे शिक्षण मिळते. यामुळे वैद्यकीय क्षेत्रात जर करिअर घडवायचे असेल तर हे कॉलेज तुमच्यासाठी बेस्ट राहील. ज्यांना मुंबईमध्येच वैद्यकीय शिक्षण घ्यायचे असेल अशा विद्यार्थ्यांनी या महाविद्यालयाचा विचार जरूर करायला हवा.

4) ग्रँट गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, मुंबई : मुंबईमधील हे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज राज्यातील टॉप पाच मेडिकल कॉलेजच्या यादीत समाविष्ट आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांनी एमबीबीएस ची डिग्री मिळवली तर त्यांना नक्कीच चांगल्या पगाराची नोकरी मिळणार आहे आणि त्यांचे करिअर सेट होणार आहे.

5) आर्मड् फोर्सेस मेडिकल कॉलेज : या कॉलेजमध्ये वैद्यकीय अभ्यासासाठी 150 जागा उपलब्ध आहेत. हे महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकाचे सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आहे. या कॉलेजची स्थापना 1962 मध्ये झाली असून अनेक विद्यार्थी या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे जर तुम्हालाही वैद्यकीय क्षेत्रात करिअर घडवायचे असेल तर तुम्ही या महाविद्यालयाचा नक्कीच विचार करू शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!