Top Medical College In Maharashtra : नुकत्याच काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य बोर्डाने बारावीचा निकाल जाहीर केला आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात एच एस सी म्हणजेच बारावी बोर्डाचा निकाल जाहीर झाला असून बारावी सायन्स उत्तीर्ण झाल्यानंतर आता बहुतांश विद्यार्थी इंजिनिअरिंगच्या ऍडमिशन साठी आणि मेडिकलच्या ऍडमिशन साठी लगबग करत असल्याचे चित्र दिसत आहे.
दरम्यान जर तुम्हालाही एमबीबीएस ला ऍडमिशन घ्यायचे असेल आणि तुम्ही महाराष्ट्रातील टॉप मेडिकल कॉलेजच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे. कारण आज आपण महाराष्ट्रातील टॉप पाच मेडिकल कॉलेज ची माहिती जाणून घेणार आहोत. जर तुम्ही या कॉलेजमधून एमबीबीएस चा कोर्स पूर्ण केला तर नक्कीच तुमच आयुष्य चेंज होणार आहे.
ही आहेत महाराष्ट्रातील टॉप 5 मेडिकल कॉलेज

AIIMS नागपूर : AIIMS म्हणजेच ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स नागपूर हे महाराष्ट्रातील एक प्रतिष्ठित मेडिकल कॉलेज आहे. हे एक गव्हर्नमेंट कॉलेज असून इथे एमबीबीएस साठीची फी फक्त सात हजार रुपये एवढी आहे. या कॉलेजमध्ये जर तुम्हाला एमबीबीएसला ऍडमिशन घ्यायचे असेल तर NEET परीक्षा तुम्हाला चांगले गुण मिळायला हवेत. नीट परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी इथे एमबीबीएस साठी अर्ज करू शकता.
AFMC कॉलेज पुणे : AFMC अर्थातच आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज पुणे हे महाराष्ट्रातील एक प्रतिक मेडिकल कॉलेज असून राज्याच्या टॉप पास मेडिकल कॉलेजमध्ये या कॉलेजचा ही समावेश होतो. एनआयआरएफच्या ऑल इंडिया रँकिंग मध्ये या कॉलेजची रँकिंग 30 इतकी आहे. खरंतर हे एक सरकारी कॉलेज आहे मात्र या कॉलेजची फी इतर सरकारी कॉलेज पेक्षा अधिक आहे. या कॉलेजमध्ये एमबीबीएसची फी 65 लाख इतकी असल्याची माहिती समोर आली आहे. फक्त नीट परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळते.
ARMCH सोलापूर : अश्विनी रुरल मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर कुंभारी हे सोलापूर जिल्ह्यातील एक प्रतिष्ठित मेडिकल कॉलेज. हे एक प्रायव्हेट मेडिकल कॉलेज असून या कॉलेजमध्ये एमबीबीएसची फी जवळपास 45 लाख रुपये एवढी आहे. नीट परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना येथे ऍडमिशन मिळते.
BVMC पुणे : भारती विद्यापीठ डिम्ड युनिव्हर्सिटी मेडिकल कॉलेज, पुणे हे देखील महाराष्ट्रातील एक प्रतिष्ठित मेडिकल कॉलेज आहे. या महाविद्यालयाचा टॉप 5 मेडिकल कॉलेजमध्ये समावेश केला जातो. एक प्रायव्हेट कॉलेजेस इन येथून एमबीबीएस करायचे झाल्यास एक कोटीहून अधिक फी लागते. नीट परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना या कॉलेजमध्ये एमबीबीएस साठी ऍडमिशन मिळू शकते.
अण्णासाहेब चुडामन पाटील मेमोरियल मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल धुळे : उत्तर महाराष्ट्रातील धुळ्यातील हे कॉलेज महाराष्ट्रातील टॉप 5 मेडिकल कॉलेज पैकी एक आहे. जर तुम्हाला एमबीबीएस करायचे असेल तर तुम्ही या कॉलेजचा विचार करू शकता. हे एक प्रायव्हेट कॉलेज असून येथे एमबीबीएसची फी जवळपास 38 लाख रुपये इतकी आहे. NEET ही प्रवेश परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी या कॉलेजच्या एमबीबीएस साठी अर्ज करू शकतात.