विद्यार्थ्यांनो, भारतातील सर्वात महाग मेडिकल कॉलेज आपल्या महाराष्ट्रात ! ‘हे’ आहेत देशातील टॉप 10 सर्वाधिक महाग मेडिकल कॉलेज

एमबीबीएसला ऍडमिशन घेण्याच्या तयारीत आहात का? अहो मग आजची बातमी तुमच्याच कामाची आहे. खरे तर बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर अनेक विद्यार्थी मेडिकलला ऍडमिशन घेतात. यातील बहुतांशी विद्यार्थी एमबीबीएसला ऍडमिशन घेतात. दरम्यान आज आपण देशातील सर्वात महाग टॉप 10 मेडिकल कॉलेजची माहिती पाहणार आहोत. तसेच यात महाराष्ट्रातील किती कॉलेज समाविष्ट आहेत याचाही आता आपण आढावा घेणार आहोत. 

Published on -

Top Medical Colleges : महाराष्ट्र राज्य बोर्डाकडून दहावी आणि बारावीचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. दहावीचा निकाल नुकताच काही दिवसांपूर्वी लागलाय. 13 मे 2025 रोजी महाराष्ट्र राज्य बोर्डाचा एसएससी म्हणजेच दहावीचा निकाल जाहीर झाला असून बारावीचा निकाल 5 मे 2025 रोजी लागलाये.

दोन्ही वर्गांचे निकाल लागल्यानंतर आता विद्यार्थी पुढील प्रवेशासाठी लगबग करत आहेत. बारावी उत्तीर्ण झालेले अनेक विद्यार्थी इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेताय तर काही विद्यार्थी मेडिकलला ऍडमिशन घेण्याच्या तयारीत आहेत. बारावी पासआऊट झाल्यानंतर लाखो विद्यार्थी एमबीबीएसला ऍडमिशन घेतात.

हा कोर्स देशातील अनेक कॉलेजमध्ये उपलब्ध आहे. या कोर्स मध्ये ऍडमिशन घ्यायचे असेल तर विद्यार्थ्यांना नीट यूजी प्रवेश परीक्षेत चांगल्या गुणांसह उत्तीर्ण व्हावे लागते. या परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारावर विद्यार्थ्यांना एमबीबीएससाठी ऍडमिशन मिळते.

दरम्यान जर तुम्हीही यंदा बारावी उत्तीर्ण झाला असाल आणि एमबीबीएसला ऍडमिशन घेणार असाल तर आजची ही बातमी तुमच्या कामाची राहणार आहे. कारण की आज आपण देशातील सर्वात महाग टॉप 10 मेडिकल कॉलेजची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. महत्वाची बाब अशी की देशातील सर्वात महाग मेडिकल कॉलेज हे आपल्या महाराष्ट्रातच आहे.

हे आहे देशातील सर्वात महाग मेडिकल कॉलेज

मीडिया रिपोर्टनुसार देशातील सर्वात महाग मेडिकल कॉलेज आपल्या महाराष्ट्रात आहे. खरे तर भारतात एमबीबीएस ची फी 6 हजार रुपयांपासून ते तीन कोटी रुपयांपर्यंत आहे. सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएस कोर्स कमी खर्चात करता येतो.

देशातील एम्सला सर्वात स्वस्त मेडिकल कॉलेज समजले जाते. पण देशात असेही काही मेडिकल कॉलेज आहेत जे की एमबीबीएस कोर्स साठी कोट्यावधी रुपयांची फी वसूल करतात. दरम्यान भारतातील सर्वात महाग टॉप 10 मेडिकल कॉलेजेस मधील पहिले मेडिकल कॉलेज हे डॉक्टर डी वाय पाटील विद्यापीठ हे आहे.

या संस्थेच्या संपूर्ण महाराष्ट्रभर शाखा पाहायला मिळतात. या संस्थेच्या शाखा मुंबई पुण्यासारख्या प्रमुख शहरांमध्ये आहेत. या संस्थेतून जर एमबीबीएस करायचे झाले तर विद्यार्थ्यांना सुमारे 1.35 कोटी रुपये इतकी फी भरावी लागते.

नवी मुंबई मधील डी वाय पाटील मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएसचे शिक्षण घ्यायचे असेल तर दरवर्षी 30 लाख रुपये एवढी फी भरावी लागते. मात्र या फी मध्ये वसतीगृह, शिकवणी असे विविध शुल्क समाविष्ट आहेत. डी वाय पाटीलला विद्यार्थ्यांना NEET UG च्या गुणांच्या आधारावर प्रवेश दिला जातो.

देशातील इतर महाग मेडिकल कॉलेज

श्री बालाजी मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, चेन्नई : चेन्नईच हे कॉलेज या यादीत दुसऱ्या स्थानावर येते. या कॉलेजमधून जर एमबीबीएस करायचे असेल तर विद्यार्थ्यांना 1.15 कोटी रुपये इतकी फी भरावी लागते. 

श्री रामचंद्र मेडिकल कॉलेज अँड रिसर्च इन्स्टिट्यूट : चेन्नई मधील हे मेडिकल कॉलेज सगळ्यात महाग मेडिकल कॉलेजच्या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. या कॉलेजची MBBS ची फी 1.13 कोटी रुपये इतकी आहे. 

एसआरएम मेडिकल कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, चेन्नई : चेन्नई मधील या कॉलेजची फी देखील फारच अधिक आहे. या कॉलेजची MBBS फी 1.13 कोटी रुपये इतकी आहे. हे कॉलेज या यादीत चौथ्या स्थानी येते. 

साविता मेडिकल कॉलेज, चेन्नई : या कॉलेजमधून जर एमबीबीएस करायचे असेल तर विद्यार्थ्यांना 1.11 कोटी रुपये इतकी फिरावे लागते. हे देशातील सर्वात महाग मेडिकल कॉलेजच्या यादीत पाचव्या स्थानी येते.

भारती विद्यापीठ, महाराष्ट्र : महाराष्ट्रातील हे कॉलेज देशातील सर्वात महाग मेडिकल कॉलेजच्या यादीत 6 व्या क्रमांकावर येथे आणि या कॉलेजमधून एमबीबीएस करायचे असेल तर विद्यार्थ्यांना 1.03 कोटी रुपये एवढी फी भरावी लागते.

चेट्टीनाड हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, चेन्नई : या यादीत हे कॉलेज सातव्या क्रमांकावर येते. या कॉलेजमधून एमबीबीएस करायचे असेल तर विद्यार्थ्यांना 1.01

संतोष मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, गाझियाबाद, दिल्ली एनसीआर : या यादीत हे कॉलेज आठव्या क्रमांकावर येते आणि याचे शुल्क सुमारे 1.1 इतकी आहे. 

एमजीएम मेडिकल कॉलेज, नवी मुंबई : नवी मुंबई मधील हे मेडिकल कॉलेज देशातील सर्वात महाग मेडिकल कॉलेजच्या यादीत नवव्या क्रमांकावर आहे. या कॉलेजमधून एमबीबीएस करायचे झाल्यास विद्यार्थ्यांना एक कोटी रुपये फी भरावी लागते. 

दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, वर्धा : राज्याच्या वर्धा येथील या कॉलेजमधून एमबीबीएस करायचे असेल तर विद्यार्थ्यांना एक कोटी रुपये एवढी फी भरावी लागते. हे महाग मेडिकल कॉलेजच्या यादीत दहाव्या क्रमांकावर येते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe