जानेवारीमध्ये भारतात सर्वाधिक विक्री होणाऱ्या टॉप 10 कार कोणत्या? कोणती कार बनली नंबर 1 ?

वर्षाच्या शेवटी म्हणजे डिसेंबरमध्ये, लोक सहसा नवीन कार खरेदी करणे टाळतात, जेणेकरून त्यांना पुढील वर्षाच्या नोंदणीसह नवीन कार मिळू शकेल किंवा जुन्या स्टॉकवरील सवलतीचा लाभ घेता येईल. जानेवारी महिन्यात जुन्या स्टॉक वर कंपन्यांकडून मोठी ऑफर दिली जाते.

Tejas B Shelar
Published:

Top Selling Car In January : भारतातील ऑटोमोबाईल उद्योग अलीकडे भरभराटीला आला आहे. जानेवारी २०२५ हा भारतीय ऑटोमोबाईल उद्योगासाठी एक चांगला महिना ठरला होता. खरेतर, अनेकजण नवीन वर्षाच्या सुरुवातीला कार खरेदी करता. डिसेंबर महिन्यात कार खरेदी करण्याऐवजी नव्या वर्षात कार खरेदी करण्याला पसंती दाखवले जाते.

वर्षाच्या शेवटी म्हणजे डिसेंबरमध्ये, लोक सहसा नवीन कार खरेदी करणे टाळतात, जेणेकरून त्यांना पुढील वर्षाच्या नोंदणीसह नवीन कार मिळू शकेल किंवा जुन्या स्टॉकवरील सवलतीचा लाभ घेता येईल. जानेवारी महिन्यात जुन्या स्टॉक वर कंपन्यांकडून मोठी ऑफर दिली जाते.

जानेवारी 2025 मध्ये देखील भारतातील अनेक ऑटो दिग्गज कंपन्यांनी आपल्या विविध मॉडेल्सवर मोठ्या प्रमाणात डिस्काउंट ऑफर आणली होती. याचाच परिणाम म्हणून जानेवारीमध्ये कार विक्रीचा आलेख वाढला.

पण तुम्हाला जानेवारी 2025 मध्ये भारतात कोणती कार सर्वाधिक विक्री झाली? जानेवारी महिन्यात सर्वाधिक विक्री होणाऱ्या टॉप 10 कार कोणत्या? याबाबत माहिती आहे का? नाही ना मग आज आपण याच बाबत सविस्तर आढावा घेणार आहोत. जानेवारी महिन्यात सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या कारची आता आपण माहिती पाहणार आहोत.

जानेवारी 2025 मध्ये सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या टॉप 10 कार

मारुती वॅगनार : जानेवारी महिन्यात मारुती वॅगनार सर्वाधिक विकली जाणारी कार बनली. या महिन्यात या कारचे सर्वाधिक 24 हजार 78 युनिट विकले गेलेत.

मारुती बलेनो : मारुती सुझुकीची मारुती बलेनो या यादीत दुसऱ्या क्रमांकावर राहिली. या कारचे 19,965 युनिट जानेवारी 2025 मध्ये विकले गेलेत.

हुंडाई क्रेटा : या यादीत हुंडाई क्रेटा ही गाडी तिसऱ्या क्रमांकावर राहिली. या कारचे 18 हजार 522 युनिट जानेवारी 2025 मध्ये विकले गेलेत.

मारुती स्विफ्ट : या यादीत मारुती स्विफ्ट ही गाडी चौथ्या क्रमांकावर राहिली. या गाडीचे 17,081 युनिट विकले गेलेत अशी नोंद करण्यात आली आहे.

Tata पंच : टाटा मोटर्स कंपनीचे टाटा पंच ही गाडी या यादीत पाचव्या क्रमांकावर राहिली. या गाडीचे 16231 युनिट विकले गेलेत.

मारुती ग्रँड विटारा : मारुती सुझुकीची आणखी एक गाडी या यादीत आपल्याला दिसते. या यादीत मारुती ग्रँड विटारा ही गाडी सहाव्या क्रमांकावर राहिली. या गाडीचे एकूण पंधरा हजार 784 युनिट विकले गेलेत.

महिंद्रा स्कॉर्पिओ : महिंद्रा अँड महिंद्रा या कंपनीची महिंद्रा स्कॉर्पिओ ही या यादीतील एक मात्र गाडी. ही गाडी या यादीत सातव्या क्रमांकावर राहिली. या गाडीचे एकूण 15 हजार 442 युनिट विकले गेलेत.

टाटा नेक्सन : टाटा कंपनीचे टाटा नेक्सन या गाडीचे जानेवारी 2025 मध्ये 15 हजार 397 युनिट विकले गेलेत.

मारुती डिझायर : मारुती सुझुकी या कंपनीचे मारुती डिझायर या गाडीचे जानेवारी 2025 मध्ये पंधरा हजार 383 युनिट विकले गेलेत आणि ही गाडी या यादीत नवव्या क्रमांकावर राहिली.

Maruti Fronx : या यादीत ही गाडी दहाव्या क्रमांकावर राहिली आणि या गाडीचे एकूण 15,192 युनिट विकले गेलेत.

जानेवारी 2025 मध्ये विकल्या जाणाऱ्या टॉप 10 SUV

ह्युंदाई क्रेटा + क्रेटा EV : ही गाडी या यादीत पहिल्या क्रमांकावर राहिली. जानेवारी 2025 मध्ये या गाडीचे एकूण १८५२२ युनिट विकले गेलेत.

टाटा पंच + पंच EV : ही गाडी या यादीत दुसऱ्या क्रमांकावर राहिली आणि जानेवारी 2025 मध्ये या गाडीचे 16231 युनिट विकले गेलेत.

मारुती ग्रँड विटारा : मारुती सुझुकीची मारुती ग्रँड विटारा ही गाडी या यादीत तिसऱ्या क्रमांकावर राहिली. या गाडीचे एकूण पंधरा हजार 784 युनिट विकले गेलेत.

महिंद्रा स्कॉर्पियो : महिंद्रा स्कॉर्पिओ या गाडीचा या यादीत चौथा क्रमांक लागला आणि या गाडीचे जानेवारी 2025 मध्ये 15हजार 442 एवढे युनिट विकले गेलेत.

Tata Nexon + Nexon Ev : टाटा मोटर्सच्या या गाडीचा या यादीत पाचवा क्रमांक लागला, या गाडीचे 15397 युनिट विकले गेलेत.

Maruti Fronx : या यादीत ही गाडी सहाव्या क्रमांकावर राहिली आणि या गाडीचे एकूण 15,192 युनिट विकले गेलेत.

Maruti Brezza : या यादीत ही गाडी सातव्या क्रमांकावर राहिली आणि या गाडीचे एकूण 14,747 युनिट विकले गेलेत.

ह्युंदाई वेन्यू : या गाडीचे जानेवारी 2025 मध्ये 11,106 युनिट विकले गेलेत. या विक्रीसह ही गाडी या यादीत आठव्या क्रमांकावर राहिली.

महिंद्रा बोलेरो : ही गाडी या यादीत नवव्या क्रमांकावर राहिली. या गाडीच्या 8682 एवढे युनिट विकले गेलेत.

महिंद्रा XUV 3XO : या गाडीचे 8454 एवढे युनिट जानेवारी 2025 मध्ये विकले गेलेत. ही गाडी या यादीत दहाव्या क्रमांकावर राहिली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe