Toyota Fortuner EMI : येत्या काही दिवसांनी भारतात सणासुदीचा हंगाम सुरू होणार आहे. दरम्यान, जर तुम्हाला सणासुदीच्या काळात नवीन कार खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच खास करणार आहे. विशेषता ज्यांना टोयोटा Fortuner खरेदी करायची असेल त्यांच्यासाठी ही बातमी विशेष खास राहील.
टोयोटा ही भारतीय कार बाजारातील एक प्रमुख ऑटोमेकर कंपनी आहे. या कंपनीच्या अनेक SUV ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत मात्र जेव्हा विषय फॉर्च्यूनरचा निघतो तेव्हा बाकी सर्व गाड्या फेल ठरतात. फॉर्च्यूनर ही कंपनीची सर्वाधिक लोकप्रिय SUV आहे.

फॉर्च्यूनर म्हणजे रुबाब आहे, ही गाडी रस्त्यावर दिसली की, चार लोक पाहतील यात शंकाच नाही. ही गाडी थांबली तर कोणीतरी मोठा माणूस गाडीतून उतरेल अशी या गाडीची ख्याती बनली आहे. यामुळे ही गाडी आपल्या सुद्धा अंगणात उभी असावी असे स्वप्न अनेकांनी उराशी बाळगले आहे.
दरम्यान जर तुम्हाला ही फॉर्च्युनर आपल्या दारात उभे करायचे असेल आणि याची प्लॅनिंग तुम्ही सुरू केली असेल तर तुमच्यासाठी आज आम्ही खास माहिती घेऊन आलो आहोत. आज आपण 5 लाख रुपयांचे डाऊन पेमेंट करून फॉर्च्यूनर खरेदी केल्यास किती रुपयांचा ईएमआय भरावा लागणार याबाबत माहिती पाहणार आहोत.
टोयोटा फॉर्च्यूनरची किंमत किती?
टोयोटा फॉर्च्यूनरच्या किमती बाबत बोलायचं झालं तर याचे बेस व्हेरिएंट 4×2 ची एक्स शोरूम किंमत 33,78,000 रुपये (33.78 लाख रुपये) आहे. त्याच वेळी, त्याची ऑन-रोड किंमत 39,09,067 रुपये (39.09 लाख रुपये) आहे.
म्हणजे जर तुम्ही या गाडीच्या खरेदीसाठी 5 लाख रुपयांचे डाऊन पेमेंट केले तर तुम्हाला 34.09 लाख रुपये कर्ज घ्यावे लागणार आहे. जर तुम्हाला हे कर्ज 9% व्याजदराने मंजूर झाले तर तुम्हाला 54,849 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागणार आहे.
म्हणजे जर आपल्याला टोयोटा फॉर्च्युनर 4×2 बेस व्हेरिएंट 9 टक्के दराने खरेदी करण्यासाठी कर्ज मिळाले तर आपल्याला व्याज म्हणून 11,98,228 (11.98 लाख रुपये) बँकेला द्यावे लागणार आहेत. अशाप्रकारे पाच लाख रुपयांचे डाऊन पेमेंट केल्यानंतर ग्राहकांना ही गाडी 46,07,295 (46.07 लाख रुपये) रुपयांना मिळणार आहे.