Toyota Hycross : तुम्हीही नवीन कार घेण्याच्या तयारीत आहात का? अहो मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे टोयोटाने आपल्या लोकप्रिय इनोव्हा हायक्रॉस MPV चे एक नवीन व्हेरिएंट लॉन्च केले आहे.
खरंतर कंपनीची ही एमपीव्ही ग्राहकांमध्ये खूपच लोकप्रिय आहे. भारतीय मार्केटमध्ये या गाडीला जबरदस्त डिमांड असून प्रीमियम कार खरेदी करणारे अनेकजण ही गाडी घेण्याचा विचार करत असतात.

दरम्यान आता या गाडीची लोकप्रियता पाहता कंपनीकडून या मॉडेलचे एक्सक्लुझिव्ह एडिशन नुकतेच बाजारात सादर करण्यात आले आहे. ही नवीन आवृत्ती टॉप-स्पेक ZX(O) ट्रिमवर आधारित असून त्यात अनेक आकर्षक अपग्रेड्स देण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.
हे व्हेरिएंट प्रीमियम कार खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी अधिक खास ठरणार आहे. मात्र हे खास व्हेरिएंट फारच मर्यादित युनिट्समध्ये विक्रीसाठी उपलब्ध करून दिली जाणार अशी सुद्धा माहिती समोर येत आहे.
दरम्यान हे व्हेरिएंट लॉन्च झाल्यानंतर याची बुकिंग सुद्धा सुरू करण्यात आली आहे, टोयोटाच्या अधिकृत शोरूममध्ये व ऑनलाइन बुकिंग सुरू झाली आहे.
यामुळे ज्या लोकांना हे नवीन प्रीमियम वेरियंट खरेदी करायची असेल त्यांनी लवकरात लवकर बुकिंग करणे आवश्यक राहणार आहे. दरम्यान आता आपण या गाडीचे फीचर्स आणि किमतीच्या संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
गाडीचा लूक कसा आहे ?
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, या नवीन एक्सक्लुझिव्ह एडिशनच्या लूकबाबत बोलायचं झालं तर या गाडीचा लूक हा फारच भन्नाट बनवण्यात आला आहे. या नव्या एडिशनमध्ये ड्युअल-टोन एक्स्टिरिअर आणि इंटिरिअर आपल्याला पाहायला मिळत. ब्लॅक्ड आऊट रूफ व पिलर, ब्लॅक ग्रिल, अॅलॉय व्हील्स, व्हील आर्च क्लॅडिंगला ब्लॅक रंग देण्यात आलाय.
INNOVA ची काळ्या रंगातील हुड बॅजिंग, तसेच “Exclusive” बॅजिंगसह अनेक कॉस्मेटिक अपग्रेड्स सुद्धा यात पाहायला मिळत आहेत. कलर ऑप्शन बाबत बोलायचं झालं तर सुपर व्हाइट व पर्ल व्हाइट हे दोन्ही प्रकार ड्युअल टोनमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे ही गाडी जबरदस्त प्रीमियम लुक देत असून ग्राहकांना ही गाडी भुरळ घालणार अशी आशा कंपनीला आहे.
फिचर्स आणि इंजिन कसे आहे ?
गाडीच्या फीचर्स बाबत बोलायचं झालं तर या गाडीमध्ये अनेक भन्नाट फीचर्स अपलोडेड आहेत. यात वायरलेस चार्जर, एअर प्युरिफायर, फूटवेल लॅम्प, 10.1 इंच टचस्क्रीन, 7 इंच TFT डिस्प्ले, पॅनोरामिक सनरूफ, जेबीएल साउंड सिस्टिम, ऑटोमन सीट्स आणि 6 एअरबॅग्स यांसारखे भन्नाट फीचर्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
या गाडीमध्ये दमदार इंजिन सुद्धा देण्यात आले आहे. हायब्रिड पॉवरट्रेनमध्ये 2.0 लिटर पेट्रोल इंजिन आणि परमनंट मॅग्नेट मोटर असून एकूण आउटपुट 186 PS इतका आहे. मायलेज मध्ये सुद्धा ही गाडी बेटर राहणार आहे, ही गाडी प्रीमियम असतानाही जवळपास 23.24 किलोमीटर प्रति लिटर पर्यंतचे मायलेज देण्यास सक्षम राहणार असल्याचा दावा केला जातोय.
गाडीची किंमत किती आहे ?
मिळालेल्या माहितीनुसार, इनोवा हायक्रॉसच्या ZX(O) ट्रिमच्या तुलनेत एक्सक्लुझिव्ह एडिशनची किंमत थोडीशी अधिक आहे. नव्या एक्सक्लुझिव्ह एडिशन मध्ये असे काही भन्नाट फीचर्स देण्यात आले आहेत ज्यामुळे याची किंमत अधिक राहणे स्वाभाविक होते.
नव्या एक्सक्लुझिव्ह एडिशन ची किंमत आधीच्या ZX(O) ट्रिम पेक्षा 1.24 लाखांनी अधिक आहे. या गाडीची सुरुवातीची किंमत फक्त 32.58 लाख इतकी ठेवण्यात आली आहे. तसेच हायब्रिड वेरियंट्सची किंमत 26.31 लाख ते 31.34 लाख दरम्यान ठेवण्यात आली आहे, तर पेट्रोल वेरियंट्सची किंमत 19.09 लाख ते 21.30 लाख इतकी ठेवण्यात आली आहे.