Pune News : पुणे ते छत्रपती संभाजीनगर यादरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार एसटी महामंडळाकडून पुणे ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान नवीन बससेवा सुरू करण्यात आली असून या नव्या बससेवेचा प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की पुण्यातील आयटी हब म्हणून ओळखल्या जाणार्या हिंजवडी येथून ही नवीन बस सेवा सुरू होणार आहे. हिंजवडी ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान ही बस सेवा सुरू होईल आणि यामुळे हिंजवडी येथे वास्तव्याला असणाऱ्या छत्रपती संभाजी नगर मधील कामगारांना आणि आयटी कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

खरे तर हिंजवडी हे पुण्यातील एक प्रमुख आयटी हब आहे, या ठिकाणी अहिल्यानगर तसेच छत्रपती संभाजी नगर येथील हजारो कामगार आणि कर्मचारी वास्तव्याला आहेत. नाशिक कोल्हापूर आणि छत्रपती संभाजी नगर येथील हजारो लोक येथे कामाला आहेत. यामुळे शनिवार आणि रविवारी हिंजवडी येथे कामानिमित्ताने आलेले तरुण आपल्या गावाकडे जात असतात. हेच कारण आहे की एसटी महामंडळाकडून हिंजवडी ते नाशिक आणि कोल्हापूर यादरम्यान बस सेवा सुरू करण्यात आली आहे. या बससेवेला प्रवाशांकडून चांगला प्रतिसादही मिळतोय. दुसरीकडे आता हिंजवडी ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान नवीन बस सेवा सुरू होत आहे.
कशी असणार हिंजवडी – छत्रपती संभाजी नगर नवीन बससेवा
हिंजवडी ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान शिवनेरी बस सुरू करण्यात येत आहे. यामुळे आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना थेट आपल्या कार्यालयापासून छत्रपती संभाजी नगर पर्यंतचा प्रवास करता येईल. खरंतर छत्रपती संभाजीनगर किंवा त्या मार्गावरील कर्मचाऱ्यांना गावी जाण्यासाठी सध्या स्थितीला वाकडेवाडी बसस्थानक किंवा स्वारगेट बस स्थानकापर्यंत यावे लागते.
यामुळे थेट छत्रपती संभाजी नगर पर्यंतची बससेवा सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून उपस्थित केली जात होते. मागणीच्या पार्श्वभूमीवर महामंडळाकडून शिवाजीनगर आगारावरून छत्रपती संभाजी नगर पर्यंत शिवनेरी बस सेवा सुरू करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
कसे असणार वेळापत्रक?
नव्या बससेवेच्या वेळापत्रक बाबत बोलायचं झालं तर हिंजवडी फेज तीन येथून शिवनेरी बस दर शुक्रवारी सोडली जाणार आहे, येथून दर शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता शिवनेरी बस सोडली जाईल. तसेच दर सोमवारी छत्रपती संभाजीनगर बस स्थानकातून पहाटे साडेचार वाजता शिवनेरी बस हिंजवडीकडे रवाना होणार आहे. यामुळे हिंजवडी परिसरात राहणाऱ्या छत्रपती संभाजी नगर कडील नागरिकांना आणि येथील स्थानिक नागरिकांना फायदा होणार आहे. त्यामुळे एसटी महामंडळाच्या या नव्या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.