देशातील श्रीमंत आणि अतिश्रीमंत व्यक्ती आपल्याकडील पैसा कुठे गुंतवतात ?

देशातील श्रीमंत आणि अति श्रीमंत लोक शेअर मार्केट मधील घसरणीच्या काळात आपल्याकडील पैसा कोणत्या ठिकाणी गुंतवत आहेत असा प्रश्न सर्वसामान्य गुंतवणूकदारांना पडलाय. म्हणून आज आपण देशातील श्रीमंत आणि अति श्रीमंत लोक कुठे गुंतवणूक करत आहे याबाबतची माहिती पाहणार आहोत.

Published on -

UHNI Investment : सध्या शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात चढ-उतार सुरू आहेत. शेअर मार्केट मधील ही अस्थिरता गुंतवणूकदारांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. याचा सर्वात जास्त फटका छोट्या गुंतवणूकदारांना बसतोय. यामुळे श्रीमंत आणि अति श्रीमंत व्यक्ती सुद्धा हैराण झाले आहेत. आता आपण भारतातील अतिश्रीमंत व्यक्ती (UHNIs) शेअर मार्केटमधील अस्थिरतेचा फायदा घेत आपल्या गुंतवणुकीचे प्रमाण वाढवत आहेत.

कोटक महिंद्रा बँकेने प्रसिद्ध केलेल्या ताज्या अहवालानुसार, हे उच्च संपत्ती असलेले गुंतवणूकदार त्यांच्या संपत्तीचा मोठा हिस्सा इक्विटी मार्केटमध्ये वळवत आहेत. तसेच, त्यांचा कल जागतिक गुंतवणुकीकडेही वाढला आहे, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अधिक संधी निर्माण होत आहेत.

अहवालातील माहितीप्रमाणे, अतिश्रीमंत गुंतवणूकदार सुमारे ३२% संपत्ती थेट इक्विटीमध्ये गुंतवत असून, त्यांचे सर्वाधिक लक्ष विशिष्ट निवडक शेअर्सवर आहे. त्याशिवाय म्युच्युअल फंड, पोर्टफोलियो मॅनेजमेंट सेवा (PMS), विमा योजना आणि अनलिस्टेड स्टॉक्समध्येही गुंतवणुकीचा मोठा प्रवाह दिसून येतो.

विशेषतः शेअर बाजारात नव्याने होणाऱ्या प्राथमिक समभाग विक्रीस (IPO) देखील हे गुंतवणूकदार प्रचंड प्रतिसाद देत आहेत, ज्यामुळे बाजाराला चालना मिळत आहे. गुंतवणुकीचे स्वरूप आता केवळ भारतापुरते मर्यादित न राहता, ग्लोबल अलोकेशन्सकडे झुकत आहे.

अमेरिकेसह युनायटेड किंगडम, सिंगापूर आणि संयुक्त अरब अमिराती हे ठिकाणे भारतीय श्रीमंत गुंतवणूकदारांसाठी आकर्षणाचे केंद्र बनले आहेत. याला कारण LRS (Liberalized Remittance Scheme) अंतर्गत वाढलेली गुंतवणूक मर्यादा, सरकारची अनुकूल धोरणे आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील संधी असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

विदेशात गुंतवणुकीसाठी सर्वाधिक महत्त्वाच्या कारणांमध्ये उत्तम परताव्याची अपेक्षा, पोर्टफोलियोमध्ये विविधता आणण्याची इच्छा आणि आंतरराष्ट्रीय व्यवसाय विस्ताराचा संधी या गोष्टी आघाडीवर आहेत.

अहवालानुसार, आंतरराष्ट्रीय गुंतवणूक करणाऱ्या ४७% भारतीय गुंतवणूकदारांनी निवासी रिअल इस्टेटला प्राधान्य दिले आहे, तर जागतिक शेअर बाजार आणि म्युच्युअल फंड यामध्येही त्यांचे मोठे लक्ष आहे.

भारतातील श्रीमंत आणि अतिश्रीमंतांची संख्या २०२४ च्या सुरुवातीला २.१८ लाख इतकी होती, जी २०२८ पर्यंत जवळपास दुप्पट होऊन ४.३० लाखांवर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही वर्षांत भारतीय गुंतवणूकदारांचा प्रभाव जागतिक बाजारपेठांवर वाढताना दिसेल.

कोटक बँकेच्या बँकिंग विभागाचे सीईओ ओईशर्य दास यांच्या मते, “श्रीमंत गुंतवणूकदार आता केवळ देशांतर्गत संधींवर अवलंबून राहिलेले नाहीत. ते आंतरराष्ट्रीय बाजारातील संधींवर भर देत असून, त्यामुळे त्यांच्या गुंतवणुकीत आणि संपत्तीत मोठी वाढ अपेक्षित आहे.

२०२८ पर्यंत या समुदायाचा खर्च मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता आहे.” भारतीय गुंतवणूकदारांचा हा बदलता दृष्टिकोन आणि जागतिक विस्तार भविष्यात गुंतवणुकीसाठी नवीन संधी निर्माण करणार असल्याचे स्पष्ट होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe