Union Bank Of India FD Scheme : तुम्हालाही फिक्स डिपॉझिट मध्ये पैसा गुंतवायचा आहे का? मग तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे. कारण की, आज आपण देशातील एका बड्या सरकारी बँकेच्या एफडी योजनेची माहिती पाहणार आहोत.
आज आपण युनियन बँक ऑफ इंडियाच्या एफडी योजनेची माहिती जाणून घेऊयात. खरंतर अलीकडील काही महिन्यांमध्ये देशभरातील प्रमुख बँकांकडून फिक्स डिपॉझिट चे व्याज कमी करण्यात आले आहे.

आरबीआय ने रेपो रेटमध्ये कपात केल्यानंतर बँकांनी देखील फिक्स डिपॉझिट चे व्याज कमी केलेत. युनियन बँक ऑफ इंडिया कडूनही आपले एफडीचे व्याज कमी करण्यात आले आहेत मात्र इतर काही बँकांच्या तुलनेत या बँकेचे एफ डी चे व्याजदर अजूनही चांगले आहेत.
अशा परिस्थितीत जर तुम्हालाही एक – दोन वर्षांच्या कालावधीसाठी फिक्स डिपॉझिट मध्ये पैसा गुंतवायचा असेल तर तुम्ही या सरकारी बँकेचा पर्याय निवडायला काही हरकत नाही.
खरतर युनियन बँक ऑफ इंडिया कडून आपल्या ग्राहकांसाठी सात दिवसांपासून ते दहा वर्ष कालावधीची एफडी योजना ऑफर केली जाते. दरम्यान आज आपण बँकेच्या 24 महिन्यांच्या म्हणजेच दोन वर्ष कालावधीच्या एफडी योजनेची माहिती पाहणार आहोत.
युनियन बँक ऑफ इंडियाची दोन वर्षांची एफडी योजना कशी आहे ?
युनियन बँक ऑफ इंडियाच्या दोन वर्षांच्या एफडी योजनेत गुंतवणूक करणाऱ्या सर्वसामान्य ग्राहकांना 6.50% दराने व्याज दिले जात आहे. तसेच 60 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना बँकेकडून 0.50 टक्के अधिकचे व्याज दिले जात आहे. म्हणजेच ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना युनियन बँकेकडून दोन वर्षांच्या एफडीवर सात टक्के दराने व्याज दिले जात आहे.
2 लाखांची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार ?
जर युनियन बँक ऑफ इंडियाच्या 24 महिन्यांच्या एफडी योजनेत एखाद्या सामान्य ग्राहकाने दोन लाखाची गुंतवणूक केली तर त्याला मॅच्युरिटीवर म्हणजे 24 महिन्यांचा काळ पूर्ण झाल्यानंतर 2 लाख 27,528 रुपये मिळणार आहेत.
अर्थातच 27,528 व्याज म्हणून सदर गुंतवणूकदाराला दिले जातील. तसेच जर सीनियर सिटीजन ग्राहकांनी या योजनेत दोन लाखाची गुंतवणूक केली तर त्यांना दोन लाख 29 हजार 776 रुपये मिळणार आहेत. सिनिअर सिटीजन ग्राहकांना दोन लाखाच्या गुंतवणुकीतून 29,776 रुपयांचे व्याज मिळणार आहे.