Union Bank Of India फक्त 25 हजार 656 रुपयात 30 लाखाचे Home Loan देणार ! वाचा सविस्तर

युनियन बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना 8.30 टक्के या किमान व्याजदरात Home Loan देत आहे. मात्र बँकेचा हा किमान व्याजदर असून याचा फायदा फक्त ज्या लोकांचा सिबिल स्कोर चांगला आहे त्यांनाच होणार आहे. ज्यांचा सिबिल स्कोर कमी आहे त्यांना यापेक्षा अधिक व्याज दरात कर्ज मंजूर होईल.

Tejas B Shelar
Published:

Union Bank Of India Home Loan : देशात 12 पीएसबी म्हणजेच पब्लिक सेक्टर बॅंका आहेत. यात स्टेट बँक ऑफ इंडिया ही सर्वात मोठी बँक आहे. युनियन बँक ऑफ इंडिया ही देखील देशातील एक प्रमुख सार्वजनिक क्षेत्रातील बँक. ही बँक आपल्या ग्राहकांना विविध प्रकारचे कर्ज उपलब्ध करून देते.

बँकेकडून विविध प्रकारच्या कर्जाची सुविधा कमी व्याजदरात उपलब्ध करून दिली जात असून होम लोन साठी देखील बँक फारच कमी व्याजदर आकारते.

यामुळे अनेक जण युनियन बँक ऑफ इंडिया कडून गृहकर्ज घेत आहेत. दरम्यान आज आपण UBI बँकेच्या गृह कर्जाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

युनियन बँक ऑफ इंडिया चे गृह कर्जासाठी चे व्याजदर

रिपोर्टनुसार, युनियन बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना 8.30 टक्के या किमान व्याजदरात Home Loan देत आहे. मात्र बँकेचा हा किमान व्याजदर असून याचा फायदा फक्त ज्या लोकांचा सिबिल स्कोर चांगला आहे त्यांनाच होणार आहे.

ज्यांचा सिबिल स्कोर कमी आहे त्यांना यापेक्षा अधिक व्याज दरात कर्ज मंजूर होईल. साधारणता 800 किंवा 750 पेक्षा अधिक सिबिल स्कोर असणाऱ्या लोकांना बँकेकडून या व्याजदरात कर्ज मंजूर केले जाते. मित्रांनो सिबिल स्कोर हा 300 ते 900 दरम्यान गणला जातो.

यामध्ये साडेसातशे ते नऊशे दरम्यान सिबिल स्कोर असणाऱ्या लोकांचा Cibil Score फारच चांगला मानला जातो आणि अशा लोकांना लवकर कर्ज मंजूर होते. शिवाय बँक अशा व्यक्तींकडून फारच कमी व्याज वसूल करत असते.

अशा लोकांना दिल्या जाणाऱ्या कर्जाची रक्कम सुद्धा अधिक राहू शकते. आता आपण युनियन बँक ऑफ इंडिया कडून चांगला सिबिल स्कोर असणाऱ्या लोकांनी तीस लाखांचे गृह कर्ज घेतले तर त्यांना कितीचा हप्ता भरावा लागणार आहे याबाबत माहिती पाहूयात.

30 लाखाचे Home Loan मंजूर झाल्यास कितीचा हप्ता?

युनियन बँक ऑफ इंडियाकडून 8.30% दरात तीस लाख रुपयांचे गृह कर्ज वीस वर्षांसाठी मंजूर झाले तर अशा ग्राहकाला 25 हजार 656 रुपयांचा हप्ता भरावा लागणार आहे.

म्हणजे सदर व्यक्तीला 61 लाख 57 हजार 440 रुपये भरावे लागतील. यामध्ये 30 लाख रुपयांची मुद्दल वजा केली असता 31 लाख 57 हजार 440 रुपये हे त्या व्यक्तीला व्याज स्वरूपात द्यावे लागणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe