केंद्रीय अर्थसंकल्प 2026 कडून अपेक्षा शिगेला; करसवलत, आरोग्य, प्रवास आणि उद्योग क्षेत्रावर सरकारचा फोकस

Published on -

Union Budget 2026 : देशाच्या आर्थिक दिशेला आकार देणारा केंद्र सरकारचा अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी 2026 रोजी संसदेत सादर होणार आहे. सलग नवव्यांदा अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प मांडणार असून, पगारदार वर्गापासून उद्योगजगतात मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे. करसवलत, जीएसटी दिलासा, स्वस्त घरे, आरोग्यसेवा आणि हवाई प्रवासाबाबत महत्त्वाच्या घोषणांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

इन्कम टॅक्समधील सुधारणांची मालिका पुढे सुरू राहील का, हा मोठा प्रश्न आहे. तज्ज्ञांच्या मते, अर्थसंकल्प 2026 मध्ये करप्रणाली अधिक सोपी, पारदर्शक आणि विश्वासार्ह करण्यावर भर दिला जाऊ शकतो. करदात्यांचा विश्वास वाढवणे आणि गुंतवणुकीला चालना देणे हे सरकारचे प्रमुख उद्दिष्ट असण्याची शक्यता आहे.

आरोग्य क्षेत्रालाही या अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. परवडणाऱ्या उपचारांवर भर देण्याची मागणी आरोग्य क्षेत्राकडून केली जात आहे. डिजिटल तंत्रज्ञानाचा अधिक वापर,

वैद्यकीय उपकरणांवरील कर कपात आणि आरोग्य सेवांचा खर्च कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. यामुळे देश अधिक निरोगी बनेल आणि 2047 पर्यंत विकसित भारताचे स्वप्न साकार होण्यास मदत मिळेल.

प्रवास आणि एव्हिएशन उद्योगानेही सरकारकडे मागण्या केल्या आहेत. परदेशी प्रवासासाठी लागू असलेल्या TCS नियमांमध्ये सुलभता आणावी, जेणेकरून क्रूझ आणि आंतरराष्ट्रीय प्रवास स्वस्त होतील, अशी मागणी आहे.

तसेच एव्हिएशन टर्बाइन फ्युएल (ATF) GST च्या चौकटीत आणल्यास एअरलाईन्सचा खर्च कमी होऊन हवाई प्रवास सर्वसामान्यांसाठी स्वस्त होऊ शकतो.

क्रिप्टोकरन्सीवरील 30% फ्लॅट कराबाबतही अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत. कर अधिक कठोर न करता, तो सोपा आणि स्पष्ट करण्याची मागणी क्रिप्टो क्षेत्रातून होत आहे. याशिवाय, कॉस्मेस्युटिकल्स उद्योगाने GST कमी करण्याची आणि नियम स्पष्ट करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

दरम्यान, आर्थिक सर्वेक्षणानुसार भारताची अर्थव्यवस्था 2026 मध्ये 7.4% दराने वाढण्याचा अंदाज आहे. करदात्यांची संख्या आणि सरकारी महसूल वाढत असल्याचेही चित्र आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘Reform, Perform आणि Transform’ या धोरणावर भर देत,

2047 पर्यंत आत्मनिर्भर आणि विकसित भारताचा निर्धार पुन्हा एकदा व्यक्त केला आहे. अशा पार्श्वभूमीवर, केंद्रीय अर्थसंकल्प 2026 कडून सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News