Upcoming Expressway Of India : गेल्या दहा वर्षाच्या कालावधीत भारतात रस्ते विकासाच्या अनेक प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहे. मोदी सरकारने आपल्या पहिल्या दोन कार्यकाळात दळणवळण व्यवस्था सुधारण्यावर विशेष लक्ष केंद्रित केले होते. दरम्यान आता केंद्रातील मोदी सरकार आपल्या तिसऱ्या कार्यकाळात देखील देशातील इन्फ्रास्ट्रक्चर आणि दळणवळण व्यवस्था सुधारण्याला विशेष महत्त्व दाखवणार असे दिसत आहे.
कारण की काल अर्थातच शुक्रवारी केंद्रातील मोदी सरकारने देशात आठ नवीन कॉरिडोर विकसित करण्यास मंजुरी दिली आहे. यामुळे ते शासनाच्या काळात आठ नवीन हाय स्पीड रोड कॉरिडोर तयार होणार आहेत. विशेष म्हणजे यातील एक कॉरिडॉर आपल्या महाराष्ट्रालाही मिळणार आहे.
या आठ कॉरिडॉरसाठी तब्बल पन्नास हजार 655 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यामुळे नजीकच्या काळात देशातील दळणवळण व्यवस्था आणखी सक्षम होणार आहे. अशा परिस्थितीत आता आपण केंद्रातील सरकार देशात कोणते आठ नवीन कॉरिडॉर विकसित करणारी या संदर्भात थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
तयार होणार हे 8 कॉरिडोर
नाशिक फाटा-खेड एलिव्हेटेड कॉरिडॉर : महाराष्ट्रात तयार होणारा हा आठ पदरी कॉरिडॉर पुण्याजवळ विकसित होणार असून यामुळे नाशिक फाटा ते खेड हा प्रवास जलद होईल अशी आशा आहे. रिंग रोडसारखा हा देखील एक गेमचेंजर प्रकल्प ठरणार आहे.
आग्रा-ग्वाल्हेर राष्ट्रीय हाय-स्पीड कॉरिडॉर : आग्रा आणि ग्वाल्हेर यांना जोडणारा हा कॉरिडोर सहा पदरी राहणार आहे. यामुळे या दोन्ही शहरा दरम्यानचा प्रवासाचा कालावधी निम्म्याने कमी होणार आहे.
खरगपूर – मोरग्राम राष्ट्रीय हाय-स्पीड कॉरिडॉर : हा कॉरिडोर चार पदरी राहणार आहे. या कॉरिडॉरमुळे पश्चिम बंगाल आणि ईशान्यच्या अर्थव्यवस्थेला नवीन बुस्टर मिळणार आहे. यामुळे देशाच्या एकात्मिक विकासाला चालना मिळणार आहे.
थरड – डीसा – मेहसाणा – अहमदाबाद राष्ट्रीय हाय-स्पीड कॉरिडॉर : हा एक सहा पदरी कॉरिडॉर राहणार आहे.
अयोध्या रिंग रोड : अयोध्या रिंग रोड हा उत्तर प्रदेश मध्ये तयार होणारा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प असेल. या प्रस्तावित रिंग रोड मुळे अयोध्या मधील वाहतूक कोंडी फुटणार आहे. प्रभू श्री रामरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना आणि अयोध्या मधील जनतेला या रिंग रोडचा मोठा फायदा होणार आहे.
रायपूर-रांची नॅशनल हाय-स्पीड कॉरिडॉर दरम्यान पठळगाव आणि गुमला 4-लेन विभाग : हा एक चार पदरी रस्ता राहणार आहे.
कानपूर रिंग रोड : उत्तर प्रदेश मध्ये अयोध्याप्रमाणेच कानपूर मध्ये ही रिंग रोड तयार होणार आहे. यामुळे कानपूर मधील वाहतूक कोंडी फुटणार आहे.
उत्तर गुवाहाटी बायपास आणि विद्यमान गुवाहाटी बायपासचे रुंदीकरण/सुधारणा : या प्रकल्पांतर्गत चार पदरी कॉरिडॉर विकसित होणार आहे.