Upcoming Maruti 7-Seater Cars : भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये मारुती सुझुकी हे एक विश्वसनीय नाव आहे. स्वस्तात मस्त कार्स देण्याच्या परंपरेमुळे ब्रँडने लाखो लोकांची मने जिंकली आहेत. विशेषतः MPV आणि SUV प्रकारांमध्ये कंपनीच्या कार्सला मोठी मागणी आहे.
आता मारुती त्यांच्या नवीन 7-सीटर मॉडेल्ससह बाजारात मोठा धमाका करण्याच्या तयारीत आहे. यामध्ये प्रीमियम MPV पासून बजेट-फ्रेंडली कुटुंबासाठी योग्य असलेल्या पर्यायांपर्यंत अनेक गाड्या असणार आहेत. मारुतीच्या आगामी 7-सीटर कार्स भारतीय ग्राहकांसाठी उत्तम पर्याय ठरणार आहेत. बजेट सेगमेंटपासून प्रीमियम पर्यायांपर्यंत सर्व प्रकारच्या ग्राहकांसाठी कंपनी नवीन मॉडेल्स आणत आहे.

YMC प्रीमियम इलेक्ट्रिक MPV म्हणून, YDB एक परवडणारी कुटुंब-केंद्रित कार म्हणून आणि ग्रँड विटारा 7-सीटर एक फीचर-लोडेड दमदार SUV म्हणून भारतीय रस्त्यांवर झळकतील. त्यामुळे भविष्यात या गाड्यांच्या अधिकृत घोषणांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मारुती YMC
लिस्टमधील पहिली कार आहे मारुती YMC, मारुती सुझुकीने आतापर्यंत बजेट आणि मिड-रेंज MPV मध्ये आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. मात्र, आता कंपनी प्रीमियम MPV सेगमेंटमध्ये पाऊल ठेवण्याच्या तयारीत आहे. कोडनेम ‘YMC’ असलेली ही कार टोयोटाच्या हाय-एंड प्लॅटफॉर्मवर आधारित असणार आहे.
ही MPV टोयोटासोबत पॉवरट्रेन आणि प्लॅटफॉर्म शेअर करणार असल्यामुळे तिला अत्याधुनिक फीचर्स आणि दमदार परफॉर्मन्स मिळेल. यामध्ये दोन वेगवेगळ्या बॅटरी पर्यायांची शक्यता आहे – 40kWh आणि 60kWh. मोठ्या बॅटरी पॅकसह ही कार साधारण 500km रेंज देऊ शकते.
हे मॉडेल फक्त इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये येण्याची शक्यता आहे, जे भविष्यातील ऑटोमोटिव्ह ट्रेंडशी सुसंगत असेल. 2026 च्या मध्यात ही कार बाजारात येऊ शकते आणि ती मारुतीच्या पोर्टफोलिओमधील सर्वात महागडी MPV असेल.
मारुती YDB
अपकमिंग मारुती कार्सच्या लिस्टमध्ये दुसरी कार असेल मारुती YDB सध्या मारुती Ertiga आणि XL6 सारख्या MPV साठी प्रसिद्ध आहे. YDB कोडनेम असलेली ही कार त्या श्रेणीत आणखी एक पर्याय ठरू शकते. ती जपानी बाजारातील Suzuki Spacia वर आधारित असल्याची चर्चा आहे. ही कार कुटुंबांसाठी उत्तम पर्याय असणार आहे.
यामध्ये स्लाइडिंग दरवाजे आणि प्रशस्त 3-रो केबिन मिळू शकतो, जो लांब प्रवासासाठी अतिशय सोयीस्कर ठरेल. इंजिनबाबत बोलायचे झाल्यास, यात 1.2-लिटर Z-Series पेट्रोल इंजिन मिळण्याची शक्यता आहे, जे मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह येईल. भारतीय बाजारातील सर्वात किफायतशीर 7-सीटर MPV पैकी एक म्हणून ही कार उभी राहू शकते.
मारुती ग्रँड विटारा 7-सीटर
मारुतीने ग्रँड विटाराच्या माध्यमातून SUV सेगमेंटमध्ये मोठी भरारी घेतली आहे. आता या कारचा 7-सीटर अवतार येण्याची शक्यता आहे. अलीकडेच या SUV चे टेस्टिंग स्पाय इमेजेस समोर आल्या आहेत, ज्यामुळे ती लवकरच लाँच होईल असे संकेत मिळाले आहेत. ग्रँड विटारा 7-सीटरमध्ये आधीच्या मॉडेलप्रमाणेच दमदार डिझाइन असेल, मात्र इंटीरियरमध्ये काही मोठे बदल पाहायला मिळू शकतात.
यात मोठी टचस्क्रीन, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, पॅनोरॅमिक सनरूफ आणि 360-डिग्री कॅमेरा यांसारखी हाय-एंड फीचर्स असण्याची शक्यता आहे. ही SUV दोन इंजिन पर्यायांसह येऊ शकते – 1.5-लिटर NA पेट्रोल इंजिन आणि 1.5-लिटर मजबूत हायब्रिड सिस्टम.
पहिला पर्याय 102bhp आणि 137Nm टॉर्क जनरेट करेल, तर हायब्रिड व्हर्जन 91bhp आणि 122Nm टॉर्कसह येईल. यामध्ये 5-स्पीड मॅन्युअल, 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर आणि e-CVT गिअरबॉक्सचे पर्याय असतील. ही कार 2025 च्या दुसऱ्या सहामाहीत बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे आणि महिंद्रा XUV700 सारख्या लोकप्रिय 7-सीटर SUV ना टक्कर देईल.