नोकरी मिळवणे आणि मिळाली तर ती टिकून राहील की नाही याबाबत कुठल्याही प्रकारची शाश्वती सध्या नाही. त्यामुळे जीवन जगत असताना उदरनिर्वाहासाठी व्यवसाय हा एक शाश्वत उत्पन्नाचा मार्ग असतो. तुम्ही कुठल्याही स्वरूपाचा व्यवसाय केला तर तुम्ही तुमचे जीवन अगदी आरामात व्यतीत करू शकतात व जीवन जगण्याला आवश्यक इतका पैसा कमवू शकता.
परंतु व्यवसाय जरी करायचा म्हटला तर त्याकरता देखील अगोदर आपल्याला पैसे लागतात व या पैशांच्या अभावी बरेच जण व्यवसाय करायची इच्छा असून देखील मात्र व्यवसाय करू शकत नाहीत.परंतु यामध्ये लक्षात घेण्याची बाब अशी असते की व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला लाखो रुपयांचे भांडवल टाकावे लागते असे मुळीच नसतं.

फक्त बाजारपेठेची गरज ओळखून जर तुम्ही व्यवसायाची उभारणी केली किंवा व्यवसाय सुरू केला तर कमी खर्चात देखील चांगला नफा मिळवता येणे शक्य होते. याच मुद्द्याला धरून आपण या लेखांमध्ये असे काही व्यवसाय बघणार आहोत याची सुरुवात तुम्ही तीस ते चाळीस हजार रुपयांच्या भांडवलात करू शकतात. मात्र आयुष्यभर त्या माध्यमातून लाखो रुपये महिन्याला कमवू शकतात.
30 ते 40 हजार रुपये भांडवलात सुरू करा हे व्यवसाय
क्लाऊड किचनचा व्यवसाय –
हा व्यवसाय ज्यांना स्वयंपाकाची आवड आहे त्याच्याशी निगडित असून तुमची ही आवड तुम्हाला आयुष्यभर आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण करण्यासाठी यामध्ये मदत करते. तुम्हाला जर स्वयंपाकाची आवड असेल तर तुम्ही क्लाऊड किचन सुरू करू शकतात व विशेष म्हणजे हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला दहा ते पन्नास हजार रुपयांचा खर्च अगोदर करावा लागतो. क्लाऊड किचन व्यवसाय सुरू करण्याकरिता तुमच्याकडे संपूर्ण पॅकिंग साहित्य तसेच अन्न लवकर तयार करता येईल यासाठी आवश्यक असलेली उपकरणे असणे गरजेचे असते. त्यानंतर हा व्यवसाय तुम्ही एखाद्या फूड बिजनेसशी जोडून चांगले उत्पन्न या माध्यमातून मिळवू शकतात. या व्यवसायाच्या माध्यमातून दररोज तुम्ही पाच हजार रुपये देखील नफा मिळवू शकतात इतकी क्षमता या व्यवसायाची आहे.
थंड पेय आणि स्नॅक्स एजन्सीचा व्यवसाय –
तुम्ही जर एखादी पेय आणि स्नॅक्स एजन्सी घेतली तर तुम्ही या माध्यमातून चांगला पैसा मिळवू शकतात. आपल्याला माहित आहे की, सध्याच्या कालावधीमध्ये कोल्ड्रिंक्स आणि स्नॅक्सचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला असून या व्यवसायात पैशांची गुंतवणूक तुम्हाला आयुष्यभर आर्थिक उत्पन्न मिळवून देऊ शकते.
ड्राय क्लीनर –
ड्राय क्लीनिंगचा व्यवसाय देखील मोठ्या प्रमाणावर वाढताना आपल्याला दिसून येत असून ड्राय क्लीनरची मागणी देखील दिवसेंदिवस वाढत आहे. कपड्यांचे ड्राय क्लीनिंग या माध्यमातून केली जाते हे आपल्याला माहिती आहे. साधारणपणे 50000 पेक्षा कमी रक्कमेमध्ये तुम्ही या व्यवसायाची सुरुवात करू शकता व महत्त्वाचे म्हणजे तुम्ही घरातच राहून हा व्यवसाय करू शकता.
फूड पॅकेजिंग –
तुम्हाला जर फूड पॅकेजिंग उद्योगांमध्ये एन्ट्री करायची असेल तर पन्नास हजार रुपये भांडवलात तुम्ही यामध्ये प्रवेश करू शकता. त्याच्या कालावधीत हा एक ट्रेंडिंगमध्ये असलेला व्यवसाय असून तुम्ही या माध्यमातून दररोज चार ते पाच हजार रुपये आरामात कमवू शकता.
अशा प्रकारचे व्यवसाय जर तुम्ही केले तर तुम्हाला नोकरी करण्याची गरज भासणारच नाही हे मात्र निश्चित. हे असे व्यवसाय आहेत की त्यामध्ये जर हळूहळू वाढ केली तर तुम्ही अगदी पन्नास हजार रुपयांच्या गुंतवणुकीमध्ये दररोज चार ते पाच हजार रुपयांचा निव्वळ नफा मिळवू शकतात.