UPSC Archit Dongare : देशात सध्या युपीएससीच्या निकालाची चर्चा सुरू आहे. या यूपीएससी परीक्षेच्या निकालात पुण्याचा अर्जित डोंगरे चमकला असून सध्या डोंगरे यांची संपूर्ण राज्यभर चर्चा होत आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या म्हणजे UPSC चा नागरी सेवा परीक्षा 2024 चा अंतिम निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे.
या निकालात पुन्हा एकदा एका मुलीने बाजी मारली आहे. शक्ती दुबे यांनी या परीक्षेच्या निकालात पहिला क्रमांक मिळवला आहे. यात राज्यातील शिक्षणाचे माहेरघर म्हणून ख्यातनाम असणाऱ्या पुण्यातील अर्चित डोंगरेने सुद्धा घवघवीत यश मिळवले आहे.

डोंगरे यांनी यूपीएससीच्या परीक्षेत देशात तिसरा क्रमांक मिळवून आपल्या राज्याचा झेंडा फडकावला आहे. त्यांनी पुण्याच्या शिरपेच्यात एक मानाचा तुरा रोवला आहे. यामुळे सध्या सर्वत्र यूपीएससीच्या या निकालाची जोरदार चर्चा सुरू आहे.
खरेतर, यूपीएससीच्या निकालात पुन्हा एकदा मुलींनी आघाडी घेतली आहे. कारण की देशात पहिला क्रमांक शक्ती दुबे यांना तर दुसरा क्रमांक हर्षिता गोयल यांना मिळाला आहे. म्हणजेच मुलांमध्ये पुण्याचे अर्चित हे संपूर्ण देशात पहिल्या क्रमांकावर राहिले आहेत.
महत्त्वाची बाब अशी की गेल्या वर्षीच्या या परीक्षेत राज्यातील 50 हून अधिक उमेदवारांनी यश मिळवले असून या संबंधित यशवंत विद्यार्थ्यांवर सध्या सर्वत्र कौतुकांचा वर्षा होत आहे. या निकालाची आणखी एक मोठी गोष्ट अशी की, पहिल्या शंभरमध्ये चार महाराष्ट्रातील म्हणजेच मराठी उमेदवारांचा समावेश आहे.
यामध्ये अर्चित डोंगरे हे दुसऱ्या क्रमांकावर, शिवांश जगदे 26व्या क्रमांकावर, विवेक शिंदे 93व्या क्रमांकावर आणि तेजस्वी देशपांडे 99 व्या क्रमांकावर राहिले आहेत. या विद्यार्थ्यांच्या घवघवीत यशामुळे सध्या या सर्व यशवंत विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे. यामुळे या संबंधित विद्यार्थ्यांच्या कुटुंबात तसेच त्यांच्या गावात, शहरात मोठे आनंदाचे वातावरण आहे.
कशी होती UPSC ची परीक्षा?
मिळालेल्या माहितीनुसार, 2024 च्या यूपीएससीची लेखी परीक्षा सप्टेंबरमध्ये, तर मुलाखती जानेवारी ते एप्रिल 2025 दरम्यान झाल्या होत्या. ही यूपीएससीची परीक्षा 1129 जागांसाठी संपन्न झाली अन या परीक्षेच्या मुलाखती संपन्न झाल्यापासून उमेदवारांना याच्या निकालाची प्रतीक्षा होती.
अखेर कार या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून या निकालामुळे अनेकांचे अधिकारी बनण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे. दरम्यान यूपीएससीने काढलेल्या या पदभरतीत आयएएसच्या 180, आयएफएसच्या 55, आयपीएसच्या 147, गट अ च्या 605 आणि गट ब च्या 142 जागांचा समावेश होता. यातील 50 जागा या दिव्यांग उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आल्या होत्या हे विशेष.
कोण आहे अर्चित ?
मिळालेल्या माहितीनुसार अर्चित डोंगरे यांनी आपले शालेय शिक्षण राजधानी मुंबईत घेतले. तसेच त्यांनी ज्युनियर कॉलेज पुण्यातुन पूर्ण केले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे कॉलेजनंतर त्यांनी एका वर्षासाठी एका नामांकित आयटी कंपनीत काम सुद्धा केले. त्यानंतर मग त्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला आणि यूपीएससी परीक्षेची तयारी करण्यासाठी अखेर नोकरी सोडली. आता त्यांचा हा निर्णय सार्थकी लागला आहे.
यूपीएससीच्या परीक्षेत ते देशात तिसऱ्या क्रमांकावर उत्तीर्ण झाले आहेत अन राज्यनिहाय विचार केला असता ते पहिल्या क्रमांकावर आहेत. यूपीएससी राज्यनिहाय रँकिंग जाहीर करत नसले तरी, अर्चित हा महाराष्ट्रातील सर्वोच्च रँकिंगचा उमेदवार आहे. यामुळे आपण अर्चित हे महाराष्ट्रातून पहिले आले आहेत असं म्हणू शकतो.