महाराष्ट्रातून धावणाऱ्या ‘या’ वंदे भारत एक्सप्रेसला अतिरिक्त थांबा मंजूर !

सध्या मुंबईहून सहा वंदे भारत ट्रेन सुरू आहेत. यातीलच एका वंदे भारत एक्सप्रेसला गुजरात मधील आनंद रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर होणार अशा बातम्या सध्या प्रसार माध्यमांमध्ये झळकत आहेत. तथापि, या घोषणेच्या 15 दिवसानंतरही, आनंद जंक्शनवर ट्रेनला थांबा मंजूर करण्यात आलेला नाही. यामुळे या वंदे भारत ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

Published on -

Vande Bharat Express : महाराष्ट्रातुन धावणाऱ्या एका महत्वाच्या वंदे भारत एक्सप्रेस संदर्भात एक महत्त्वाचे अपडेट हाती आले आहे. खरे तर सध्या राज्यात 11 वंदे भारत ट्रेन सुरू आहेत. मुंबई येथील मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद, सीएसएमटी ते जालना, सीएसएमटी ते सोलापूर, सीएसएमटी ते शिर्डी, सीएसएमटी ते मडगाव, नागपूर ते बिलासपुर, नागपूर ते इंदोर, नागपूर ते सिकंदराबाद, पुणे ते कोल्हापूर आणि पुणे ते हुबळी या मार्गांवर ही गाडी सुरू आहे.

म्हणजेच सध्या मुंबईहून सहा वंदे भारत ट्रेन सुरू आहेत. यातीलच एका वंदे भारत एक्सप्रेसला गुजरात मधील आनंद रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर होणार अशा बातम्या सध्या प्रसार माध्यमांमध्ये झळकत आहेत. मुंबई सेंट्रल ते गांधीनगर ही वंदे भारत आनंद रेल्वे स्थानकावर थांबा घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.

आनंद लोकसभेचे खासदार मितेश पटेल यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केले होते की, गांधीनगर-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला आनंद जंक्शनवर थांबा जाहीर झाला आहे. तथापि, या घोषणेच्या 15 दिवसानंतरही, आनंद जंक्शनवर ट्रेनला थांबा मंजूर करण्यात आलेला नाही.

यामुळे या वंदे भारत ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. आनंद जंक्शन वरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांच्या माध्यमातून या गाडीला आनंद जंक्शनवर कधी थांबा मिळणार असा प्रश्न उपस्थित केला जातोय.

खरेतर, आनंद लोकसभेचे खासदार मितेश पटेल यांनी मुंबई गांधीनगर वंदे भारत ट्रेनला आनंद जंक्शनवर थांबा मंजूर झाला असल्याची घोषणा केली होती, पण आता ही घोषणा होऊन बरेच दिवस उलटले आहेत, मात्र तरीही आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर आनंदला थांबा नसल्याचे दाखवले जात आहे.

कारण वेबसाईटवर तिकीट बुकिंग अजून उपलब्ध झालेले नाही. इन्स्टाग्रामवर खासदार मिटेश पटेल यांनी सांगितले होते की, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्ण यांना प्रभावी सादरीकरण केल्यानंतर रेल्वे मंत्रालयाने आनंद रेल्वे स्थानकावर वंदे भारत ट्रेनला थांबा मंजूर केला आहे.

दूरध्वनीवरून केंद्रीय रेल्वेमंत्री यांनी खासदार महोदयांना ही माहिती दिली होती. या ट्रेनला आनंद येथे थांबा मंजूर झाला असल्याची घोषणा करत खासदार महोदयांनी आपल्याकडे साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले.

खरंतर 25 फेब्रुवारीला आनंदीच्या खासदारांनी ही घोषणा केली आणि आता जवळपास पंधरा दिवसांचा कालावधी उलटल्यानंतरही या घोषणेबाबत कोणतीच कारवाई झालेली नसल्याचे दिसत आहे.

यामुळे रेल्वे बोर्ड गांधीनगर ते मुंबई दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनला आनंद येथे थांबा देणार की नाही हा मोठा प्रश्न उपस्थित होतोय. या मार्गावरील सर्वात वेगवान ट्रेन वंदे भारत एक्सप्रेसवर आनंद ते मुंबईकडे जाण्यास असमर्थ असल्याने अनेक प्रवासी निराश झाले आहेत.

उल्लेखनीय म्हणजे, गुजरातची राजधानी गांधीनगर येथून निघाल्यानंतर वंदे भारत एक्सप्रेस मुंबईच्या मध्यभागी पोहोचण्यापूर्वी अहमदाबाद, वडोदरा, सूरत, वापी आणि बोरिवली येथे थांबते.

म्हणजे ही गाडी आधीच गुजरात मधील चार रेल्वे स्थानकावर थांबते आणि आता आनंद मध्ये थांबा मंजूर झाला तर हे पाचवे रेल्वे स्थानक ठरणार आहे. तथापि रेल्वे बोर्डाकडून याबाबतचा अधिकृत निर्णय अजून पर्यंत घेण्यात आलेला नाही. यामुळे हा निर्णय नेमका कधी होणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe