Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेस च्या संदर्भात एक नवीन अपडेट हाती आली आहे. वंदे भारत एक्सप्रेस ही 2019 मध्ये सुरू झाली होती. सुरुवातीला ही गाडी राष्ट्रीय राजधानी दिल्लीवरून सुरू झाली. राष्ट्रीय राजधानी नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर ही गाडी सुरू झाली.
त्यानंतर मग देशातील इतर महत्त्वाच्या राज्यांना या गाडीची भेट मिळाली. आपल्या महाराष्ट्राला सुद्धा आत्तापर्यंत 11 वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळालेली आहे. दुसरीकडे महाराष्ट्राला आगामी काळात बारावी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन मिळण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आली आहे.

राज्यातील सीएसएमटी ते सोलापूर सीएसएमटी ते जालना सीएसएमटी ते मडगाव सीएसएमटी ते शिर्डी मुंबई सेंट्रल ते गांधीनगर मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद नागपूर ते बिलासपुर नागपूर ते इंदोर नागपूर ते सिकंदराबाद पुणे ते कोल्हापूर आणि पुणे ते हुबळी या मार्गांवर ही गाडी सुरू आहे.
दरम्यान आता पुणे ते नागपूर या मार्गांवर ही गाडी सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एवढेच नाही तर मुंबई ते नागपूर या मार्गावर वंदे भारत शिल्पर ट्रेन धावण्याची सुद्धा शक्यता आहे.
अशी सगळी परिस्थिती असतानाच आता देशातील एका महत्त्वाच्या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनचे संचालन सुरू होणार अशी खात्रीलायक बातमी समोर आली असून या नव्या गाडीचे वेळापत्रक देखील समोर आले आहे.
नव्या गाडीचा रूट कसा राहणार?
मीडिया रिपोर्ट नुसार, गोरखपूर आणि पाटणा ही दोन शहरे जोडण्यासाठी आगामी काळात एक नवीन वंदे भारत ट्रेन सुरू होणार आहे. गोरखपूर आणि पाटणा यादरम्यानचे पाचशे किलोमीटरचे अंतर ही नवीन वंदे भारत ट्रेन जलद गतीने पार करणार आहे.
नव्या गाडीमुळे प्रवाशांचा प्रवास कालावधी जवळपास पाच तासांनी वाचणार आहे. या नव्या गाडीमुळे प्रवाशांना या मार्गावर वेगवान, आरामदायी आणि परवडणारा रेल्वे प्रवास उपलब्ध होईल असा आशावाद व्यक्त करण्यात आलाय.
ही गाडी गोरखपूरहून सुरू होऊन मुझफ्फरपूर येथे थांबेल आणि त्यानंतर पटनाला पोहोचणार आहे. पूर्व मध्य रेल्वेने याबाबतचा प्रस्ताव सादर केला असून हा प्रस्ताव सध्या अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे रेल्वे बोर्डाकडून या संदर्भात काय निर्णय होणार ही गोष्ट नक्कीच पाहण्यासारखी राहणार आहे.
नव्या गाडीचे वेळापत्रक कसे असेल?
खरंतर या गाडीला अजून अंतिम मंजुरी मिळालेली नाही यामुळे या गाडीचे वेळापत्रक कसे असणार? याबाबतची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण रिपोर्टवर जर विश्वास ठेवला तर ही गाडी गोरखपूरहून सकाळी 6 वाजता निघेल आणि मुझफ्फरपूरला सकाळी 10 वाजता येईल आणि मग पटनाला सकाळी 11 वाजता पोहोचणार आहे.