Vande Bharat Express : देशात सध्या वंदे भारत एक्सप्रेस चे जाळे तयार केले जात आहे. सध्या स्थितीला देशातील 60हून अधिक मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहे. महाराष्ट्र बाबत बोलायचं झालं तर राज्याला आत्तापर्यंत 11 वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळालेली आहे. दरम्यान आता महाराष्ट्राला आणखी एका वंदे भारत ट्रेनची भेट मिळणार आहे.
राज्यात सध्या मुंबई येथील सीएसएमटी ते जालना सीएसएमटी ते सोलापूर सीएसएमटी ते शिर्डी सीएसएमटी ते मडगाव मुंबई सेंट्रल ते गांधीनगर मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद नागपूर ते बिलासपूर नागपूर ते इंदोर नागपूर ते सिकंदराबाद पुणे ते कोल्हापूर आणि पुणे ते हुबळी या मार्गांवर वंदे भारत ट्रेन सुरु आहे.

दरम्यान आता मुंबईला आणखी एका नव्या वंदे भारतची भेट मिळणार असल्याचे चित्र तयार होत आहे. मध्य रेल्वेचे मुंबईचे नवीन महाव्यवस्थापक यांनी महाव्यवस्थापक पदाचा कारभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच कोल्हापुरातील छत्रपती शाहू महाराज टर्मिनसला भेट दिली.
अमृत भारत योजनेंतर्गत कोल्हापुरातील रेल्वे स्थानकावर सुरू असलेल्या कामाची त्यांनी प्रत्यक्ष तासभर पाहणी करत अनेक सूचना दिल्यात. खरेतर, गतिशक्ती योजनेतील वैभववाडी रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.
लवकरच रेल्वे बोर्डाकडून या मार्गाच्या निधीची पूर्तता होईल, त्यानंतर कोकण रेल्वेची वाहतूक मार्गी लागेल असे आश्वासन सुद्धा मीना यांनी यावेळी दिले आहे. याशिवाय त्यांनी मार्चनंतर कोल्हापूरला आणखी एक स्वातंत्र वंदे भारत ची भेट मिळू शकते असे संकेतही दिले आहेत.
मीना यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना मार्च अखेरीस अर्थातच या चालू महिन्याच्या अखेरीस पुणे आणि मिरज मार्गावरील दुहेरीकरणाचे काम पूर्ण होईल, तसेच मुंबईतील चारही फ्लॅटफॉर्मचे काम पूर्ण होईल असे सांगितले असून हे काम पूर्ण झाल्यानंतर मग स्वतंत्र वंदे भारत एक्स्प्रेस आणि पुण्यापर्यंत धावणारी विशेष रेल्वे सह्याद्री एक्स्प्रेस मुंबईपर्यंत चालवली जाईल अशी माहिती दिली आहे.
नक्कीच मार्चनंतर सध्या पुण्यापर्यंत धावणारी सह्याद्री एक्सप्रेस मुंबई पर्यंत चालवली गेली तर याचा कोल्हापूर ते मुंबई दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे यात शंकाच नाही. दुसरीकडे मुंबईपर्यंत स्वतंत्र वंदे भारत चालवली गेली तर याचाही कोल्हापूरकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. वंदे भारत मुळे कोल्हापूर ते मुंबई हा प्रवास आणखी वेगवान होणार आहे.