Vande Bharat Express : तुम्हीही वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास करता का अहो मग तुमच्यासाठी आजची बातमी फारच खास ठरणार आहे. खरं तर सध्या देशातील अनेक महत्त्वाच्या मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेसचे संचालन सुरू झाले आहे. महाराष्ट्रात देखील अनेक मार्गांवर ही गाडी सुरू आहे. महाराष्ट्राला आतापर्यंत अकरा वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळाली आहे.
राज्यातील सीएसएमटी ते जालना, सीएसएमटी ते मडगाव, सीएसएमटी ते सोलापूर, सीएसएमटी ते शिर्डी, मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद, नागपूर ते बिलासपुर, नागपूर ते इंदोर, नागपूर ते सिकंदराबाद, पुणे ते कोल्हापूर आणि पुणे ते हुबळी या मार्गांवर वंदे भारत ट्रेन सुरू आहे.

वंदे भारत ट्रेन ही संपूर्ण भारतीय बनावटीची ट्रेन असून या गाडीचा वेग 160 किलोमीटर प्रतितास इतका आहे. या गाडीमुळे प्रवाशांचा प्रवास फारच सुपरफास्ट आणि सुरक्षित झाला आहे. त्यामुळे या गाड्यांना प्रवाशांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळतोय. परंतु वंदे भारत ट्रेनचे नियम हे इतर एक्सप्रेस ट्रेनच्या तुलनेत वेगळे आहेत.
अशा परिस्थितीत आज आपण वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी वंदे भारतच्या खास नियमांची माहिती घेऊन आलो आहोत. आज आपण या गाडीने प्रवास करताना प्रवासी किती सामान घेऊन जाऊ शकतो? प्रवाशांना आपल्या सोबत किती बॅगा घेऊन जाण्याची परवानगी दिली जाते? याबाबत माहिती पाहणार आहोत.
नियम काय सांगतात?
आरामदायक प्रवासासाठी भारतीय रेल्वेने वंदे भारत ट्रेन सुरू केली आहे. वंदे भारत ट्रेन थोड्या तासात लांब पल्ल्याचा प्रवास करते, म्हणून या ट्रेनमध्ये फक्त बसण्याची जागा देण्यात आली आहे. या ट्रेनमध्ये खुर्चीसारखे सीट्स म्हणजे आसन आहेत, म्हणून यात बॅग सीटच्या खाली ठेवण्यासाठी जागा नाहीये.
यामुळे वंदे भारतात प्रति व्यक्ती 2 पेक्षा जास्त ट्रॉली बॅग घेऊन जाऊ शकत नाही. कारण ट्रेनमध्ये बॅग सीटच्या वर ठेवण्यासाठी जागा आहे. ट्रेनच्या प्रत्येक ओळीमध्ये 3 ते 4 सीट्स असतात. अशा परिस्थितीत, जर प्रत्येकाने 4 ते 5 बॅग आणल्या तर इतर प्रवाश्यांना वस्तू वर ठेवण्यासाठी जागा शिल्लक राहणार नाही.
यामुळे वंदे भारत ट्रेनमध्ये एक व्यक्ती जास्तीत जास्त दोन बॅगा घेऊन जाऊ शकतो असा नियम आहे. या व्यतिरिक्त आपण वंदे भारत ट्रेनमध्ये मोठे बॉक्स देखील नेऊ शकत नाही. कारण ट्रेनमधील सीट्सवरील रॅकमध्ये जास्त जागा नाही.
हे रॅक केवळ ट्रॉली बॅगच्या आकारानुसार बनविले आहेत. आपण आपले सामान वंदे भारत ट्रेनमध्ये आपल्या सीटच्या बाजूला ठेवू शकत नाही. कारण सीटच्या बाजूला सामान ठेवले तर लोकांना ये-जा करतांना अडचण होईल.
दोन सीट्समध्ये फक्त लोक ये-जां करू शकतात एवढी जागा आहे. या ट्रेनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे देखील आहेत. परंतु जर तुमचा सामान चोरीला गेल असेल तर तुम्हाला प्रथम अटेंडंट, गार्ड किंवा जीआरपी एस्कॉर्टकडे तक्रार करावी लागणार आहे.