Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेसच्या संदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. महाराष्ट्राला आगामी काळात दोन नव्या वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे. खरेतर, सध्या महाराष्ट्रातून 11 वंदे भारत एक्सप्रेस धावत आहेत.
राज्यातील सीएसएमटी ते जालना सीएसएमटी ते मडगाव सीएसएमटी ते सोलापूर सीएसएमटी ते शिर्डी मुंबई सेंट्रल ते गांधीनगर मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद नागपूर ते बिलासपूर नागपूर ते इंदोर नागपूर ते सिकंदराबाद पुणे ते कोल्हापूर आणि पुणे ते हुबळी या मार्गांवर ही गाडी सुरू आहे.

अशातच आता महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे आगामी काळात राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी दोन नवीन वंदे भारत एक्सप्रेस सुरू केल्या जाणार आहेत.
दरम्यान आता आपण याचं वंदे भारत एक्सप्रेस च्या संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कोणत्या मार्गांवर धावणार वंदे भारत ट्रेन?
मिळालेल्या माहितीनुसार पुणे ते नागपूर आणि मुंबई ते नागपूर या मार्गांवर वंदे भारत ट्रेन सुरू होण्याची शक्यता आहे. या दोन्ही वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सुरू करण्यासाठी आवश्यक असणारी रेल्वे मार्गाची चाचणी नुकतीच संपन्न झाली आहे.
दरम्यान, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धरमवीर मीणा यांनी अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुणे ते नागपूर आणि मुंबई ते नागपूर या मार्गावर वंदे भारत ट्रेन सुरू होणार असल्याची माहिती दिली आहे.
नागपूर व भुसावळ विभागातील खासदारांची आणि मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धरमवीर मीणा यांच्यात नुकतेच एक महत्त्वाची बैठक संपन्न झाली.
या बैठकीत नागपूर पुणे रेल्वे मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याचा निर्णय झालेला असतानाही या मार्गावर प्रत्यक्षात वंदे भारत सुरू होत नसल्याचा मुद्दा चर्चेत आला.
यावेळी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक मीना यांनी लवकरच पुणे ते नागपूर आणि मुंबई ते नागपूर या मार्गावर वंदे भारत ट्रेन सुरू होईल अशी माहिती दिली.
प्रवाशांचा बहुमूल्य वेळ वाचणार
जर पुणे ते नागपूर आणि मुंबई ते नागपूर या मार्गांवर वंदे भारत ट्रेन सुरू झाली तर प्रवाशांचा बहुमूल्य वेळ वाचणार अशी माहिती जाणकारांकडून समोर येत आहे. या गाड्यांमुळे प्रवाशांचा किमान एक ते दीड तास वेळ वाचणार आहे.
पुण्याहून सध्या तीन वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहेत आणि जर पुणे ते नागपूर ही गाडी सुरू झाली तर वंदे भारत एक्सप्रेस ची संख्या चारवर पोहोचणार आहे. प्रस्तावित करण्यात आलेली नागपुर – पुणे वंदे भारत एक्सप्रेस आठवड्यातून सहा दिवस चालवली जाणार आहे.