Vande Bharat Express : महाराष्ट्रातून चालवल्या जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस बाबत एक महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे. राज्यातुन सध्या अकरा वंदे भारत एक्सप्रेस सुरु आहेत. सीएसएमटी ते सोलापूर, सीएसएमटी ते शिर्डी, CSMT ते नांदेड, सीएसएमटी ते कोल्हापूर, मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद,
पुणे ते हुबळी, पुणे ते कोल्हापूर, पुणे ते नागपूर, नागपूर ते बिलासपूर, नागपूर ते इंदोर, नागपूर ते सिकंदराबाद, सीएसएमटी ते गोवा या महत्त्वाच्या मार्गांवर वंदे भारत ट्रेन सुरू आहे. महत्वाची बाब म्हणजे येत्या काही दिवसांनी पुणे ते नांदेड दरम्यानही वंदे भारत ट्रेन चालवली जाणार असल्याची बातमी समोर आली आहे.

नक्कीच रेल्वेच्या या निर्णयामुळे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील जनतेला मोठा फायदा होणार आहे. अशातच आता मुंबईहून चालवल्या जाणाऱ्या एका वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन बाबत महत्त्वाचे अपडेट हाती आले आहे.
सीएसएमटी ते मडगाव दरम्यान चालवल्या जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस चे वेळापत्रकात पुन्हा एकदा बदल करण्यात आला आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की पावसाळा सुरू झाल्यानंतर कोकण रेल्वे मार्गावर पावसाळी वेळापत्रक लागू केले जाते.
या अंतर्गत मुंबई ते गोवा दरम्यान चालवल्या जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसच्या फेऱ्या कमी केल्या जातात. तसेच गाडीचा स्पीड ही कमी होतो. मात्र आता पुन्हा एकदा या मार्गावर सर्वसाधारण वेळापत्रक लागू होणार आहे.
नव्या वेळापत्रकानुसार आता सीएसएमटी-मडगाव वंदे भारत एक्सप्रेस आठवड्यातून सहा दिवस चालवली जाणार आहे. पूर्वी पावसाळी वेळापत्रकामुळे ही ट्रेन जून ते ऑक्टोबर दरम्यान आठवड्यातून फक्त तीन दिवस चालवली जात होती.
पण आता 22 ऑक्टोबर पासून नियमित वेळापत्रक लागू होईल आणि या वेळापत्रकानुसार ही गाडी नियमितपणे सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शनिवार आणि रविवारला म्हणजे आठवड्यातून सहा दिवस चालवली जाणार आहे.
कोणकोणत्या स्थानकावर थांबा घेणार
दादर
ठाणे
पनवेल
खेड
रत्नागिरी
कणकवली
थिविम
वेळापत्रक कस राहणार
ही गाडी मुंबई येथून सकाळी 05:25 मिनिटांनी सोडली जाणार आहे आणि त्याच दिवशी ही गाडी गोव्याला पोहोचेल. तसेच ही गाडी दुपारी दोन वाजून 40 मिनिटांनी गोव्यातून सोडले जाणार आहे आणि त्याच दिवशी रात्री दहा वाजून 25 मिनिटांनी मुंबईला पोहचणार आहे