प्रतीक्षा संपली ! ‘या’ तारखेपासून धावणार मुंबई – नांदेड वंदे भारत एक्सप्रेस, खा. अशोक चव्हाण यांची मोठी माहिती

मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ही बातमी परभणी आणि नांदेड जिल्ह्यातील प्रवाशांसाठी अधिक खास ठरणार आहे कारण की मुंबई ते नांदेड वंदे भारत ट्रेन कधी सुरू होणार? याबाबत खासदार अशोक चव्हाण यांनी मोठी माहिती दिली आहे.

Published on -

Vande Bharat Express : महाराष्ट्रातील वंदे भारत एक्सप्रेसचे नेटवर्क आणखी वाढणार आहे. खरे तर, सध्या स्थितीला राज्यात एकूण 11 वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहेत. राज्यातील सीएसएमटी ते सोलापूर, सीएसएमटी ते शिर्डी, सीएसएमटी ते जालना, सीएसएमटी ते मडगाव, मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद, नागपूर ते सिकंदराबाद, नागपूर ते इंदोर, नागपूर ते बिलासपूर, पुणे ते कोल्हापूर आणि पुणे ते हुबळी या मार्गांवर ही गाडी सुरू आहे.

दरम्यान यापैकी मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते जालना दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसचा विस्तार नांदेड पर्यंत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान मुंबई – नांदेड वंदे भारत एक्सप्रेस प्रत्यक्षात रुळावर कधी धावणार ? याची प्रतीक्षा आता संपली आहे. भारतीय जनता पक्षाचे खासदार अशोक चव्हाण यांनी मुंबई – नांदेड वंदे भारत एक्सप्रेस कधी धावणार याची तारीख सोशल मीडियावर जाहीर केली आहे. 

मुंबई – नांदेड वंदे भारत एक्सप्रेस कधी धावणार?

खासदार अशोक चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट महिन्यात मुंबई नांदेड वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे. 26 ऑगस्ट 2025 रोजी मुंबई नांदेड वंदे भारत एक्सप्रेस रुळावर धावेल अशी माहिती खासदार चव्हाण यांनी दिली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते जालना दरम्यान धावणारी वंदे भारत ट्रेन आता थेट नांदेड पर्यंत धावणार आहे यामुळे परभणी आणि नांदेड या मराठवाड्यातील दोन जिल्ह्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळेल अशी आशा आहे. मराठवाड्यातील परभणी आणि नांदेड हे दोन्ही जिल्हे आता वंदे भारत एक्सप्रेसच्या नकाशावर येणार आहेत. 

मुंबई – नांदेड वंदे भारत एक्सप्रेसचे वेळापत्रक कसे असणार? 

रेल्वे कडून मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड – मुंबई वंदे भारत एक्सप्रेस सकाळी पाच वाजता नांदेड रेल्वे स्थानकावरून सोडली जाणार आहे आणि दुपारी दोन वाजून 25 मिनिटांनी ही गाडी मुंबईला पोहोचणार आहे.

तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ही गाडी दुपारी एक वाजून दहा मिनिटांनी सोडली जाणार आहे आणि रात्री दहा वाजून पन्नास मिनिटांनी ही गाडी नांदेडला पोहोचणार आहे. मुंबई ते नांदेड यादरम्यानचा प्रवास वंदे भारत एक्सप्रेस मुळे अवघ्या साडेनऊ तासांमध्ये पूर्ण होणार आहे. 

ही ट्रेन कोण कोणत्या स्थानकावर थांबणार?

सीएसएमटी – नांदेड वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन या मार्गावरील दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, छत्रपती संभाजी नगर, जालना आणि परभणी या महत्त्वाच्या स्थानकावर थांबा घेणार आहे.

दुसरीकडे, मीडिया रिपोर्ट मध्ये मुंबई – नांदेड वंदे भारत एक्सप्रेसच्या एसी चेअर कारचे तिकीट सुमारे 1750 रुपये आणि एक्झिक्युटिव्ह एसी चेअर कारचे तिकीट 3300 रुपयांपर्यंत राहील असा दावा करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!