ब्रेकिंग : मुंबईला दोन आणि पुण्याला चार नवीन वंदे भारत एक्सप्रेस मिळणार ! कसे असतील मार्ग ?

मुंबईला दोन आणि पुण्याला चार नवीन वंदे भारत एक्सप्रेस ची भेट मिळणार आहे. मीडिया रिपोर्टवर जर विश्वास ठेवला तर आगामी काळात मुंबई ते शेगाव, पुणे ते शेगाव, पुणे ते बेळगाव, पुणे ते बडोदा, पुणे ते सिंकदराबाद अन मुंबई ते कोल्हापूर या सहा मार्गांवर ही गाडी सुरू होणार आहे.

Published on -

Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेस ही संपूर्ण स्वदेशी बनावटीची पहिली सेमी हाय स्पीड ट्रेन आहे. ही गाडी सर्वप्रथम 2019 मध्ये सुरू झाली. सर्वप्रथम ही गाडी नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर चालवली गेली आणि नंतर टप्प्याटप्प्याने देशातील इतर महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीचे संचालन सुरू झाले.

सध्या ही गाडी देशातील एकूण 65 महत्त्वाच्या मार्गांवर सुरू आहे. आपल्या महाराष्ट्राला देखील आतापर्यंत अकरा वंदे भारत एक्सप्रेस ची भेट मिळालेली आहे.

राज्यातील मुंबई सेंट्रल ते गांधीनगर मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद सीएसएमटी ते जालना सीएसएमटी ते सोलापूर सीएसएमटी ते शिर्डी सीएसएमटी ते मडगाव नागपूर ते बिलासपुर नागपूर ते इंदोर नागपूर ते सिकंदराबाद पुणे ते कोल्हापूर आणि पुणे ते हुबळी या मार्गांवर ही गाडी सुरू आहे.

विशेष बाब अशी की, लवकरच महाराष्ट्राला आणखी सहा नवीन गाड्यांची भेट मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुंबईला दोन आणि पुण्याला चार नवीन वंदे भारत एक्सप्रेस ची भेट मिळणार आहे.

मीडिया रिपोर्टवर जर विश्वास ठेवला तर आगामी काळात मुंबई ते शेगाव, पुणे ते शेगाव, पुणे ते बेळगाव, पुणे ते बडोदा, पुणे ते सिंकदराबाद अन मुंबई ते कोल्हापूर या सहा मार्गांवर ही गाडी सुरू होणार आहे. नक्कीच या वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्या तर मुंबई आणि पुणेकरांना या गाड्यांचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.

वंदे भारत स्लीपर ट्रेन सुद्धा सुरू होणार!

वंदे भारत एक्सप्रेसच्या अभूतपूर्व यशानंतर आता वंदे भारत स्लीपर ट्रेन देखील सुरु होणार आहे. येत्या काही महिन्यांनी वंदे भारत स्लीपर ट्रेन प्रत्यक्षात रुळावर धावताना दिसणार आहे.

केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नुकत्याच काही दिवसांपूर्वी लवकरच वंदे भारत स्लीपर ट्रेन आता रेल्वे प्रवाशांसाठी सुरू केली जाईल अशी माहिती दिली होती.

जानेवारी 2025 मध्ये वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून ही गाडी नवी दिल्ली ते श्रीनगर या मार्गावर सर्वप्रथम धावेल असा दावा काही मीडिया रिपोर्ट मध्ये करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe