Vande Bharat Express : महाराष्ट्रात आणि देशात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या फारच उल्लेखनीय आहे. रेल्वेचे नेटवर्क पाहता रेल्वे प्रवासाला प्रवाशांकडून विशेष प्राधान्य दाखवले जाते. दरम्यान, रेल्वे प्रवाशांसाठी रेल्वे कडून वेगवेगळ्या सोयी सुविधा देखील उपलब्ध करून दिल्या जात आहेत.
रेल्वे कडून नवनवीन रेल्वे मार्ग विकसित केले जात आहेत सोबतच वंदे भारत एक्सप्रेस सारख्या हाय स्पीड गाड्या सुद्धा सुरू करण्यात आल्या आहेत. आता याच वंदे भारत एक्सप्रेस च्या संदर्भात एक नवीन अपडेट हाती आली आहे.

खरे तर काल गुजरातला एका नव्या वंदे भारत एक्सप्रेस ची भेट मिळाली आहे. साबरमती टू वेरावल दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या गाडीला हिरवा झेंडा दाखवलाय.
दरम्यान गुजरात राज्यातील रेल्वे प्रवाशा नंतर आता बिहारच्या रेल्वे प्रवाश्यांसाठी गोड बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार बिहारलाही एक नवीन वंदे भारत ट्रेन मिळणार आहे.
कोणत्या मार्गावर धावणार वंदे भारत?
पूर्व मध्य रेल्वे मुख्यालयाच्या माध्यमातून रेल्वे बोर्डाकडे नव्या वंदे भारत एक्सप्रेस च्या संदर्भातील प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावात रॅक्सॉल ते कोलकाता दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस आणि अमृत भारत एक्सप्रेस ट्रेन चालवली गेली पाहिजे असे नमूद करण्यात आले आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे पूर्व मध्य रेल्वेच्या या प्रस्तावावर रेल्वे बोर्डाकडून सकारात्मक निर्णय घेतला जाईल अशी आशा आता व्यक्त केली जात आहे. या प्रस्तावाच्या समर्थनार्थ, रॅक्सॉल ते कोलकाता पर्यंत थेट रेल्वे मार्ग महत्त्वाचा मानला जात आहे.
आता या दिशेने तांत्रिक तयारी सुरू केली गेली आहे. सर्व प्रथम, ओव्हरहेड इलेक्ट्रिक (ओएचई) वायर आणि संपर्क वायर निश्चित करण्याचे काम तीव्र करण्यात आले आहे. यासाठी, ई-निविदा सुद्धा निघाली आहे, 65 लाख रुपयांच्या किंमतीवर निविदा जारी करण्यात आली आहे.
यासाठीची अंतिम दिनांक 16 जून निश्चित करण्यात आली आहे. त्यानंतर, निविदा दुपारी 12:30 वाजता उघडली जाईल. दरम्यान यामध्ये निवड झालेल्या कंपनीला सहा महिन्यांत ओएचईचे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य निश्चित केले गेले आहे. यामुळे या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस किंवा अमृत भारत एक्सप्रेस ट्रेन चालवली जाऊ शकते असा दावा केला जात आहे.
महाराष्ट्रालाही मिळणार नवीन वंदे भारत एक्सप्रेस
दुसरीकडे पुणे ते नागपूर आणि मुंबई ते नागपूर या दोन मार्गांवरही वंदे भारत ट्रेन चालवण्याची मागणी जोर धरत असून याबाबतचा प्रस्ताव देखील अंतिम टप्प्यात आलेला आहे. रेल्वेने पुणे ते नागपूर या मार्गावर वंदे भारत ट्रेन सुरू करण्यास मंजुरी दिली असून लवकरचं या मार्गावर वंदेबार ट्रेन धावेल अशी माहिती सुद्धा समोर येत आहे.
सध्या राज्यात एकूण 11 वंदे भारत सुरू आहेत आणि ही गाडी सुरू झाली तर ही संख्या आणखी वाढणार आहे. त्यामुळे राज्यातील रेल्वे प्रवाशांचा प्रवास वेगवान होईल असा दावा केला जातोय.