Vande Bharat Express : महाराष्ट्रातून धावणाऱ्या एका वंदे भारत एक्सप्रेसच्या वेळापत्रकात बदल करण्यात येणार आहे. सध्या महाराष्ट्रातून एकूण 11 वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहेत.
राज्यातील मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद, सीएसएमटी ते सोलापूर, सीएसएमटी ते शिर्डी, सीएसएमटी ते मडगाव, पुणे ते कोल्हापूर, पुणे ते हुबळी, नागपूर ते सिकंदराबाद, नागपूर ते इंदोर, नागपूर ते बिलासपुर या मार्गांवर वंदे भारत ट्रेन सुरू आहे.

दरम्यान यापैकी मुंबई सेंट्रल ते गांधीनगर यादरम्यान चालवल्या जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन च्या वेळापत्रकात 27 जुलैपासून बदल करण्यात येणार आहे. खरे तर या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला प्रायोगिक तत्त्वावर एक अतिरिक्त थांबा मंजूर करण्यात आला आहे. या गाडीला एक अतिरिक्त थांबा मंजूर झाला असल्याने या गाडीचे वेळापत्रक चेंज होणार आहे.
या रेल्वे स्थानकावर थांबणार वंदे भारत ट्रेन
मुंबई सेंट्रल ते गांधीनगर कॅपिटल दरम्यान चालवली जाणारी वंदे भारत ट्रेन वलसाड या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे. महत्वाची बाब म्हणजे रेल्वेने घेतलेल्या या निर्णयाची अंमलबजावणी येत्या तीन दिवसांनी म्हणजेच 27 जुलै 2025 पासून सुरू होणार आहे.
याबाबत पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी मोठी माहिती दिली आहे. विनीत अभिषेक यांनी सांगितल्याप्रमाणे मुंबई सेंट्रल ते गांधीनगर कॅपिटल या दरम्यान धावणारी वंदे भारत ट्रेन ( गाडी क्रमांक 20901) 28 जुलै 2025 पासून वलसाड या रेल्वे स्थानकावर देखील थांबा घेणार आहे.
ही गाडी सकाळी आठ वाजून 19 मिनिटांनी वलसाड रेल्वे स्थानकावर येईल आणि दोन मिनिटांचा थांबा घेऊन पुढे रवाना होणार आहे. तसेच गाडी क्रमांक 20902 म्हणजेच गांधीनगर कॅपिटल ते मुंबई सेंट्रल वंदे भारत ट्रेन 27 जुलै 2025 पासून वलसाडे रेल्वे स्थानकावर थांबणार आहे.
ही गाडी सायंकाळी पाच वाजून 51 मिनिटांनी वलसाड रेल्वे स्थानकावर येईल आणि दोन मिनिटांचा थांबा घेऊन पुढे रवाना होणार आहे. या बदलामुळे ही गाडी आता गांधीनगर रेल्वे स्थानकावरून दोन वाजून पाच मिनिटांऐवजी दोन वाजता सोडली जाणार आहे. वलसाड येथे मंजूर करण्यात आलेल्या अतिरिक्त थांब्यामुळे अहमदाबाद, आनंद, वडोदरा आणि सुरत येथील वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.
कस असणार नवीन वेळापत्रक
मुंबई सेंट्रल – गांधीनगर कॅपिटल वंदे भारत एक्सप्रेस मुंबई येथून सकाळी सहा वाजता सोडली जाणार आहे. मग ही गाडी बोरिवली येथे सहा वाजून 23 मिनिटांनी, वापी येथे सात वाजून 56 मिनिटांनी, वलसाड येथे आठ वाजून 19 मिनिटांनी, सुरत येथे नऊ वाजता, वडोदरा येथे 10:18 वाजता, आनंद येथे 10:43 वाजता, अहमदाबाद येथे साडेअकरा वाजता आणि गांधीनगर कॅपिटल येथे बारा वाजून पंचवीस मिनिटांनी पोहोचणार आहे.
तसेच गांधीनगर कॅपिटल – मुंबई सेंट्रल वंदे भारत एक्सप्रेस गांधीनगर येथून दुपारी दोन वाजता सोडली जाणार आहे. मग ही गाडी अहमदाबाद येथे 2:40 वाजता, आनंद येथे तीन वाजून पंचवीस मिनिटांनी, वडोदरा येथे तीन वाजून 48 मिनिटांनी, सुरत येथे पाच वाजून पाच मिनिटांनी, वलसाड येथे सायंकाळी 05:51 वाजता, वापी येथे 06:13 वाजता, बोरिवली येथे 7:32 वाजता आणि मुंबई सेंट्रल येथे रात्री साडेआठ वाजता पोहोचणार आहे.