आनंदाची बातमी ! पुढील 3 महिन्यात ‘या’ राज्यांना मिळणार तब्बल 12 Vande Bharat Express ! कसे असणार रूट? वाचा….

वंदे भारत ट्रेन संदर्भात एक नवं अपडेट हाती आलं आहे. देशातील काही राज्यांना आणखी काही नवीन वंदे भारत गाडीची भेट मिळू शकते असे बोलले जात आहे. आपल्या राज्याला सुद्धा नव्या वंदे भारत मिळणार असे सांगितले जात आहे.

Published on -

Vande Bharat Express : भारतातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय रेल्वे येत्या काही महिन्यांत सुमारे 12 नवीन वंदे भारत गाड्या सुरू करण्याच्या तयारीत आहे. खरेतर, सध्या देशातील 65 हुन अधिक महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू आहे. अन आता आणखी 12 नवीन गाड्या सुरु होणार असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान या नवीन गाड्यांच्या मार्गाबाबत अंतिम निर्णय लवकरच घेतला जाणार आहे. पंतप्रधान कार्यालयाच्या म्हणजे पीएमओच्या मंजुरीनंतर याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

वंदे भारत गाड्यांचे जाळे वाढवण्याच्या हेतूने या नव्या गाड्या सुरु केल्या जाणार आहेत. वास्तविक, भारत सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ प्रकल्प अंतर्गत रेल्वेने भारतातील पहिली स्वदेशी सेमी-हाय-स्पीड ट्रेन वंदे भारत एक्सप्रेस सुरू केली.

ही गाडी 2019 मध्ये सुरु केली. पहिल्यांदा ही गाडी नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गांवर धावली. पहिली वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन 15 फेब्रुवारी 2019 रोजी चालवण्यात आली. या मार्गाचा रूट दिल्ली-कानपूर-अलाहाबाद-वाराणसी असा होता.

या गाडीच्या वेगाबाबत बोलायच झालं तर ही ट्रेन ताशी 160 किलोमीटर वेगाने धावत आहे. आता आपण कोणत्या राज्यात ही गाडी सुरु होणार? याबाबत माहिती पाहणार आहोत.

या राज्यांमध्ये धावणार वंदे भारत ट्रेन

मीडिया रिपोर्टनुसार, राज्या-राज्यांमधील आपली पोहोच वाढवत भारतीय रेल्वे लवकरच काही नवीन वंदे भारत ट्रेन सुरु करणार आहे. देशातील बिहार, राजस्थान, जम्मू आणि काश्मीर आणि कर्नाटकमध्ये आता आणखी काही नवीन वंदे भारत गाड्या सुरू होणार आहेत.

आपल्या राज्याला सुद्धा वंदे भारत गाडीची भेट मिळणार आहे. राज्यातील मुंबई पुणे कोल्हापूर धुळे अशा शहरांना या गाडीची भेट मिळणार असा अंदाज आहे. मुंबई ते शेगाव, पुणे ते शेगाव अशा अनेक मार्गांवर ही गाडी सुरु होईल असे बोलले जात आहे.

दरम्यान आता पंतप्रधान कार्यालयाकडून अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर, या दिशेने वेगाने काम सुरू होणार आहे. रेल्वे मंत्रालयाकडून पुढील तीन महिन्यांत सुमारे 12 नवीन वंदे भारत गाड्या सुरू केल्या जाऊ शकतात, मात्र याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

पण मीडिया रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे. यामुळे खरंच या राज्यांना नवीन वंदे भारत गाड्या मिळणार का? हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे. देशातील वंदे भारत रेल्वे नेटवर्कचा विस्तार वाढला तर देशातील कनेक्टिव्हिटी आणखी वाढेल.

यामुळे रेल्वे प्रवाशांचा प्रवास आणखी वेगवान होणार अशी शक्यता आहे. या संबंधित राज्यात नवीन वंदे भारत गाड्या सुरू करण्याचा उद्देश शहरे आणि गावांमधील कनेक्टिव्हिटी वाढवणे आणि प्रवासाचा वेळ कमी करणे हाच आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News