ब्रेकिंग : महाराष्ट्रातील ‘या’ दोन शहरांना मिळणार वंदे भारत एक्सप्रेसची भेट !

Published on -

Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेस संदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर येत आहे. खरे तर वंदे भारत एक्सप्रेस ही 2019 मध्ये सुरू झालेली एक संपूर्ण स्वदेशी बनावटीची सेमी हाय स्पीड ट्रेन. या गाडीची सुरुवात 2019 मध्ये झाली असून आत्तापर्यंत जवळपास सर्वच राज्यांमध्ये या गाडीचे नेटवर्क विस्तारलेले आहे.

महाराष्ट्राला ही आत्तापर्यंत बारा वंदे भारत एक्सप्रेस मिळालेले आहेत. दरम्यान आता महाराष्ट्रातील आणखी दोन महत्त्वाची शहरे वंदे भारत एक्सप्रेसच्या नकाशावर येणार आहेत.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की सद्यस्थितीला राज्यातील मुंबई ते सोलापूर, मुंबई ते शिर्डी, मुंबई ते गांधीनगर, मुंबई ते अहमदाबाद, मुंबई ते जालना, पुणे ते कोल्हापूर पुणे ते हुबळी पुणे ते नागपूर नागपूर ते इंदोर नागपूर ते सिकंदराबाद नागपूर ते बिलासपूर या मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहे.

दरम्यान आता पुणे ते हुबळी आणि मुंबई ते सोलापूर या मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस संदर्भात प्रशासनाकडून महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

या दोन्ही गाड्यांना अतिरिक्त थांबे मंजूर करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे आणि यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार अशी आशा व्यक्त केली जात आहे.

मुंबई – सोलापूर वंदे भारत ट्रेन कुठे थांबा घेणार ?

मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर दरम्यान सुरू करण्यात आलेली वंदे भारत एक्सप्रेस आता दौंड रेल्वे स्थानकावर सुद्धा थांबा घेणार आहे.

मध्य रेल्वेने सांगितले की, सीएसएमटी-सोलापूर ही गाडी आता दौंड स्थानकावर रात्री 8:13 वाजता पोहोचणार आहे. तसेच ही गाडी परतीच्या प्रवासात दौंड स्थानकावर सकाळी 8 वाजून 8 मिनिटांनी पोहोचणार आहे.

पुणे-हुबळी वंदे भारत एक्सप्रेस कुठं थांबा घेणार ?

पुणे – हुबळी मार्गावर धावणारी वंदे भारत एक्सप्रेस आता किर्लोस्करवाडी रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे. या नवीन थांब्यामुळे किर्लोस्करवाडी रेल्वे स्टेशन मधून येता करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

पुणे-हुबळी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन आता किर्लोस्करवाडी स्टेशनवर संध्याकाळी पाच वाजून त्रेचाळीस मिनिटांनी पोहोचणार आहे. तसेच परत येताना हुबळी-पुणे वंदे भारत एक्सप्रेस किर्लोस्करवाडी स्टेशनवर सकाळी नऊ वाजून 38 मिनिटांनी पोहोचणार आहे. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe