मोठी बातमी ! 2025 अखेर महाराष्ट्रातील ‘या’ शहराला मिळणार Vande Bharat Express ! 550 किमीचा प्रवास आता फक्त 7 तासात

Published on -

Vande Bharat Express : पुणे तसेच नांदेडवासीयांसाठी आनंदाची बातमी आहे. मराठवाड्याच्या विकासाला चालना मिळणार आहे. राज्यातील वंदे भारत एक्सप्रेसच जाळ वाढणार आहे. वर्षाअखेरीस पुण्याहून नांदेडसाठी ही गाडी चालवली जाणार आहे. रेल्वे प्रवाशांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.

विशेष म्हणजे डिसेंबरपर्यंत ही सेमीहायस्पीड ट्रेन सुरू होण्याची शक्यता असून स्वतः रेल्वे मंत्र्यांकडून याबाबत सकारात्मक संकेत मिळाले आहेत. नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी यासाठी पाठपुरावा केलाय.

ते पुणे–नांदेड वंदे भारत एक्सप्रेससाठी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना भेटलेत. या भेटीनंतर मंत्री महोदयांच्या आदेशानुसार रेल्वे मंत्रालयाने सकारात्मक प्रतिसाद देत प्रस्तावाची दखल घेतली असल्याची माहिती हाती आली आहे.

प्रवसाचा वेळ वाचणार

नांदेड–पुणे या सुमारे 550 किमीच्या मार्गावर वंदे भारत चालवली तर प्रवाशांचा प्रवास सुपरफास्ट होणार आहे. या गाडीमुळे प्रवास कालावधी 7 तासांवर येणार आहे. सद्यस्थितीला या मार्गांवर प्रवास पूर्ण करण्यासाठी अधिक वेळ लग्गतोय. ही सेमी हायस्पीड मुंबई- नांदेड मार्गांवर आधीच सुरु आहे. आता पुण्याहून सुरु होणार आहे. साहजिक मराठवाडा व पुणे यांच्यातील रेल्वे प्रवास याने अधिक वेगवान होणार आहे.  

कुठे मिळणार थांबा ?

नांदेड

लातूर

धाराशिव

सुविधा काय असतील ? 

एसी चेअर कार

हाय-स्पीड वाय-फाय

आरामदायी सीट्स 

प्रगत सुरक्षा

तिकीट किती असणार?  

चेअर कारचे भाडे – 1500-1900

एक्झिक्युटिव्ह क्लासचे भाडे – 2000-2500

केव्हा होणार लोकार्पण

मंत्रालयाकडून या गाडीच वेळापत्रक तसेच उद्घाटनाची तारीख दिवाळीनंतर जाहीर होणार असा अंदाज आहे. दरम्यान ही सेवा सुरू झाल्यास मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्र यांच्यातील प्रवास गतीमान होणार असून राज्याच्या एकात्मिक विकासाला चालना मिळणार आहे. कृषी, शिक्षण, उद्योग, पर्यटन अशा सर्वच क्षेत्रासाठी ही ट्रेन फायद्याची राहणार आहे. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe