Vande Bharat Express : वंदे भारत संदर्भात एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. देशाला आणखी एका नव्या वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार नरसापुर हे शहर आता वंदे भारत एक्सप्रेसच्या नकाशावर येणार आहे.
वंदे भारत एक्सप्रेस बाबत बोलायचं झालं तर सध्या स्थितीला देशातील जवळपास सर्वच महत्त्वाच्या राज्यांमध्ये ही एक्सप्रेस सुरू आहे. आपल्या राज्यात सुद्धा सद्यस्थितीला 12 वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहेत.

राज्यातील जवळपास सर्वच प्रमुख शहरे वंदे भारत एक्सप्रेसच्या नकाशावर आहेत. राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, सोलापूर, शिर्डी, नाशिक अशी अनेक महत्त्वाची शहरे वंदे भारत एक्सप्रेस ने कनेक्ट झालेली आहेत.
महत्वाची बाब म्हणजे येत्या काळात महाराष्ट्रातील आणखी काही नव्या शहरांना वंदे भारतची भेट मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, वंदे भारत स्लीपर सुद्धा रेल्वे कडून लवकरच सुरू करण्यात येणार आहे.
2026 च्या सुरुवातीलाच स्लीपर वंदे भारत लॉन्च केली जाणार अशी माहिती समोर येत आहे. दरम्यान, येत्या दोन दिवसांनी नरसापुरला वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे. नरसापुर ते चेन्नई या मार्गावर ही वंदे भारत ट्रेन सुरू करण्यात येणार आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की चेन्नई सेंट्रल ते विजयवाडा यादरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहे. दरम्यान, हीच वंदे भारत ट्रेन आता पुढे नरसापुर पर्यंत विस्तारित करण्यात येणार आहे.
17 डिसेंबर 2025 पासून चेन्नई ते विजयवाडा ही गाडी थेट नरसापुर पर्यंत चालवली जाणार आहे. अशा परिस्थितीत आता आपण नरसापुर पर्यंत चालवल्या जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनच्या वेळापत्रकाबाबत माहिती पाहुयात.
कसं राहणार नरसापुर – चेन्नई वंदे भारतचे वेळापत्रक ?
सध्या नरसापुर – चेन्नई प्रवासासाठी रेल्वे प्रवाशांना जवळपास 13 तासांपर्यंतचा वेळ खर्च करावा लागतो. मात्र या 655 किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गावर वंदे भारत ट्रेन सुरू झाल्यानंतर हा प्रवासाचा कालावधी 9 तासापर्यंत कमी होणार आहे. चेन्नईहून सकाळी साडेपाच वाजता ही गाडी सोडली जाणार आहे आणि दुपारी दोन वाजता ही गाडी नरसापुरला पोहोचणार आहे.
तसेच परतीच्या प्रवासात नरसापुर येथून 14:50 वाजता ही गाडी सोडली जाणार आहे आणि चेन्नईला 23:45 वाजता पोहोचणार आहे. आता आपण या गाडीचे तिकीट दर आणि ही गाडी कोणकोणत्या स्टेशनवर थांबा घेणार याची माहिती पाहूयात.
या स्थानकावर थांबा घेणार
चेन्नई सेंट्रल ते विजयवाडा या दरम्यान धावणारी वंदे भारत ट्रेन आता थेट नरसापुर पर्यंत चालवली जाणार आहे आणि या गाडीला रेनिगुंटा जंक्शन, नेल्लोर, ओंगोल, तेनाली जंक्शन, विजयवाडा जंक्शन, गुडीवाडा जंक्शन आणि भीमावरम टाउन असे थांबे मंजूर करण्यात आले आहेत.
गाडीच्या तिकीटराबाबत बोलायचं झालं तर एसी चेअर कारणे प्रवास करणाऱ्यांना 1635 रुपये आणि एक्झिक्युटिव्ह चेअरकारने प्रवास करणाऱ्यांना 3 हजार 30 रुपये एवढे तिकीट निश्चित करण्यात आले आहे.













