वंदे भारत एक्सप्रेस संदर्भात मोठी अपडेट! ‘या’ शहराला एकाच वेळी मिळणार चार Vande Bharat ची भेट, कसे असतील रूट?

देशातील वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनचे जाळे आणखी वाढवले जाणार आहे. लवकरच देशातील चार महत्वाच्या मार्गांवर वंदे भारत ट्रेन सुरू होण्याची शक्यता आहे. सध्या देशातील 65 हुन अधिक महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू असून लवकरच आणखी काही महत्त्वाच्या मार्गांची यामध्ये भर पडणार आहे.

Updated on -

Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेस बाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. वंदे भारत एक्सप्रेस ही 2019 मध्ये सुरू झाली होती. पहिल्यांदा ही गाडी देशातील नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर चालवली गेली. यानंतर देशातील 65 हुन अधिक महत्त्वाच्या मार्गांवर हे गाडी सुरू झाली.

महाराष्ट्र बाबत बोलायचं झालं तर राज्याला आत्तापर्यंत अकरा महत्त्वाच्या वंदे भारत एक्सप्रेस ची भेट मिळालेली आहे. अशातच, आता देशाला लवकरच आणखी काही वंदे भारतची भेट मिळू शकते अशी बातमी समोर येत आहे. मुजफ्फरपूरला आगामी काळात चार नव्या वंदे भारत ट्रेनची भेट मिळणार असल्याचा दावा केला जात आहे.

मुजफ्फरपूरहून येत्या काळात चार वंदे भारत एक्सप्रेस गाड्या सुरू होण्याची शक्यता असून याच साठी आता युद्ध पातळीवर तयारी सुरू झाली आहे. या गाड्या सुरू करण्यासाठी रेल्वे बोर्डाकडून आता व्यवहार्यता अहवाल तयार केला जाणार आहे.

पूर्व मध्य रेल्वेच्या निर्देशानुसार सोनपूर मंडळाने यासंदर्भातील प्रक्रिया सुद्धा सुरू केली आहे. हमे आपणास सांगू इच्छितो की, मुजफ्फरपूर स्थानक व्यवस्थापकाकडून या अहवालाची मागणी करण्यात आली आहे.

फिजिबिलिटी टेस्ट म्हणजे व्यवहार्यता अहवाल तयार करण्यासाठी सुमारे 15 दिवसांपर्यंत जंक्शनवर वाणिज्य विभाग आणि ऑपरेटिंग विभागाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांकडून अभ्यास केला जाणार आहे.

हा अभ्यास पूर्ण झाल्यानंतर मग याबाबतचा सविस्तर अहवाल मुख्यालयाला पाठवला जाईल. दरम्यान आता आपण मुजफ्फरपुर येथून कोणत्या चार शहरांसाठी वंदे भारत ट्रेन सुरू करण्याचा विचार होतोय यासंदर्भात माहिती पाहणार आहोत.

या शहरांसाठी सुरू होणार वंदे भारत ट्रेन

मुजफ्फरपूरहून चार शहरांसाठी वंदे भारत ट्रेन सुरू होण्याची शक्यता आहे. मुजफ्फरपुर ते नवी दिल्ली, न्यू जलपाईगुडी, हावडा आणि बनारससाठी वंदे भारत एक्सप्रेस चालवल्या जाणार आहेत. खरे तर याबाबतचा प्रस्ताव सोनपुर मंडळाने पूर्व मध्य रेल्वेच्या माध्यमातून रेल्वे बोर्डाकडे आधीच पाठवला होता.

आता याच प्रस्तावाचा विचार सुरू करण्यात आला असून रेल्वे बोर्डाने या प्रस्तावाच्या अंमलबजावणीस गती दिली आहे. नेहमीप्रमाणे प्रत्यक्षात वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यापूर्वी त्याची व्यवहार्यता तपासण्याच्या उद्देशाने हा अहवाल मागवण्यात आला आहे.

या अहवालात मुजफ्फरपूर जंक्शनवर वंदे भारत एक्सप्रेसची मागणी आहे का, असल्यास कोणत्या मार्गांसाठी आहे, तसेच या गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला तर अन्य गाड्यांवर परिणाम होईल का, याचा अभ्यास केला जाईल. तिकीट दरासंबंधीही विश्लेषण केले जाणार आहे.

हा अहवाल गोपनीय पद्धतीने तयार केला जाणार असून पीआरएस काउंटरवर आलेल्या प्रवाशांसह प्लॅटफॉर्मवर उपस्थित प्रवाशांची मते जाणून घेतली जातील, जेणेकरून वंदे भारत एक्सप्रेसच्या परिचालनात कोणताही अडथळा येऊ नये. त्यामुळे आता हा अहवाल नेमका काय सांगणार यावरच या चारही वंदे भारतचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News