रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ महत्त्वाच्या मार्गावर पण सुरू होणार वंदे भारत एक्सप्रेस, कसा असणार रूट?

Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेस या देशातील संपूर्ण स्वदेशी बनावटीची पहिली हाय स्पीड ट्रेन आहे. या गाडीची सुरुवात 2019 मध्ये झाली. पहिल्यांदा ही गाडी नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर चालवण्यात आली.

यानंतर टप्प्याटप्प्याने देशातील इतर महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू करण्यात आली. आतापर्यंत देशातील जवळपास सर्वच राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये वंदे भारत एक्सप्रेस पोहोचलेली आहे.

आपल्या महाराष्ट्र बाबत बोलायचं झालं तर राज्याला आत्तापर्यंत 11 वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळालेली आहे. महत्वाची बाब अशी की आगामी काळात राज्याला आणखी काही नव्या वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे. पुणे ते नागपूर यादरम्यान वंदे भारत एक्सप्रेस चालवण्याची योजना आहे.

तसेच मुंबई ते नागपूर या मार्गावर वंदे भारत स्लीपर ट्रेन चालवली जाईल असे म्हटले जात आहे. एवढेच नाही तर उत्तर प्रदेशातील बरेली ते मुंबई दरम्यान ही वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

मुंबई बरेली वंदे भारत स्लीपर जुलै महिन्यात सुरू होऊ शकते अशी सुद्धा माहिती देण्यात आली आहे. दुसरीकडे आता देशातील आणखी एका महत्त्वाच्या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार असल्याची बातमी समोर आली आहे.

या मार्गावर धावणार वंदे भारत एक्सप्रेस

मिळालेल्या माहितीनुसार, लखनऊ ते भोपाल दरम्यान वंदे भारत ट्रेन चालवली जाऊ शकते. खरे तर भोपाल ते लखनऊ दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस चालवण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे विचाराधीन आहे.

मात्र या प्रस्तावाला मान्यता मिळण्याआधीच भोपाल लखनऊ वंदे भारत एक्सप्रेस इंदोर वरून सोडली गेली पाहिजे अशी नवीन मागणी उपस्थित करण्यात आली आहे. भोपाळ आणि लखनऊ दरम्यान वंदे भारत ट्रेन चालवण्याची मागणी आता वाढत आहे.

खरंतर, भोपाळ आणि लखनऊ दरम्यान वंदे भारत ट्रेन चालवण्याची मागणी आधीच विचाराधीन आहे, असे असतानाच आता ही ट्रेन इंदूर येथून चालवण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे, ज्यावर रेल्वे बोर्ड देखील विचार करत असल्याचे सांगितले गेले आहे.

असे म्हटले जात आहे की जूनच्या अखेरीस भोपाळ आणि लखनऊ दरम्यान वंदे भारत ट्रेन सुरू होईल. सुरवातीला ही ट्रेन 6 दिवसांसाठी धावणार आहे, परंतु आता इंदूर आणि लखनऊ दरम्यान वंदे भारत ट्रेन चालवण्याची मागणी देखील वाढत आहे. कारण इंदूर आणि लखनऊ दरम्यान फक्त मर्यादित गाड्या धावतात. यामुळे आता रेल्वे बोर्डाकडून नेमका काय निर्णय होणार ही गोष्ट पाहण्यासारखी ठरणार आहे.

महाराष्ट्रातील या मार्गावर धावणार वंदे भारत

महाराष्ट्र बाबत बोलायचं झालं तर राज्यात सध्या स्थितीला 11 वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहेत. दुसरीकडे मुंबई ते शेगाव, पुणे ते शेगाव, पुणे ते सिकंदराबाद, मुंबई ते छत्रपती संभाजी नगर, पुणे ते नागपूर, मुंबई ते कोल्हापूर, पुणे ते धुळे, मुंबई ते धुळे

अशा विविध मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस चालवण्याची सुद्धा मागणी उपस्थित करण्यात आली आहे. दरम्यान यातील काही महत्त्वाच्या मार्गावर आगामी काळात वंदे भारत ट्रेन प्रत्यक्षात धावतानाही दिसणार आहे.