ठरलं ! देशाला लवकरच मिळेल 53वी वंदे भारत, 31 ऑगस्टला ‘या’ मार्गावर सुरू होणार वंदे भारत एक्सप्रेस ! पण….

मुंबई ते कोल्हापूर दरम्यानच्या वंदे भारत एक्सप्रेस संदर्भात रेल्वे बोर्डाकडून निर्णय झालेला नाहीये. त्यामुळे कोल्हापूर करांमध्ये कमालीची नाराजी पाहायला मिळत आहे. दुसरीकडे, उत्तर प्रदेशला अकरावी वंदे भारत एक्सप्रेस मिळणार असल्याची बातमी समोर आली आहे.

Tejas B Shelar
Published:
Vande Bharat Express

Vande Bharat Express : जेव्हापासून भारतीय रेल्वेच्या ताफ्यात वंदे भारत एक्सप्रेस ही संपूर्ण स्वदेशी बनावटीची सेमी हाय स्पीड ट्रेन दाखल झाली आहे तेव्हापासून रेल्वेचे संपूर्ण रुपडेचं बदलले आहे. ही गाडी कमाल 160 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावण्यास सक्षम असल्याचा दावा रेल्वेने केला आहे.

सध्या मात्र ही गाडी तिच्या कमाल क्षमतेत धावत नाहीये. पण आगामी काळात जेव्हा रुळ अपग्रेड केले जातील तेव्हा ही गाडी तिच्या कमाल क्षमतेत धावेल असा विश्वास आहे. या गाडीमध्ये प्रवाशांना अनेक हायटेक सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत.

जेवणाची सोय देखील चांगली आहे. याशिवाय या गाडीचा प्रवासा खूपच सुरक्षित आहे. एका विशिष्ट प्रणालीमुळे या गाडीचे आमने-सामने टक्कर होणे अशक्य आहे. हेच कारण आहे की अनेकजण या गाडीने प्रवास करण्यास पसंती दाखवत आहेत.

यामुळे तिकीट तर अधिक असतानाही या गाडीचे तिकीट मिळवणे अशक्य होऊ लागले आहे. सध्या ही गाडी देशातील 52 महत्त्वाच्या मार्गांवर सुरू आहे. विशेष म्हणजे यातील आठ मार्ग आपल्या महाराष्ट्रातील आहेत म्हणजेच महाराष्ट्राला आतापर्यंत आठ वंदे भारत एक्सप्रेस मिळालया आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान कोल्हापूर येथे एका प्रचार सभेसाठी आले होते. त्यावेळी त्यांनी कोल्हापूरला नवीन वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार अशी घोषणा केली होती.

म्हणजे आगामी काळात कोल्हापूरला देखील वंदे भारत ट्रेन मिळणार आहे. ही ट्रेन मुंबई ते कोल्हापूर दरम्यान चालवली जाण्याची दाट शक्यता आहे. पण आता लोकसभा निवडणुकीचा निकाल लागून आणि नवीन सरकार सत्तेवर येऊन बऱ्याच दिवसांचा काळ उलटला आहे.

तरीही मुंबई ते कोल्हापूर दरम्यानच्या वंदे भारत एक्सप्रेस संदर्भात रेल्वे बोर्डाकडून निर्णय झालेला नाहीये. त्यामुळे कोल्हापूर करांमध्ये कमालीची नाराजी पाहायला मिळत आहे. दुसरीकडे, उत्तर प्रदेशला अकरावी वंदे भारत एक्सप्रेस मिळणार असल्याची बातमी समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशला लवकरच 11वी वंदे भारत एक्सप्रेस मिळणार आहे, जी मेरठला युपीच्या राजधानीसोबत म्हणजेच लखनऊ सोबत जोडणार आहे. 31 ऑगस्ट रोजी या ट्रेनचे उद्घाटन होणार अशी खात्रीलायक बातमी देखील समोर आली आहे.

22490/22489 म्हणून नियुक्त केलेली, ट्रेन मेरठ शहरातून सकाळी 6:35 वाजता निघेल आणि मुरादाबाद आणि बरेली कव्हर करून दुपारी 1:45 वाजता लखनौला पोहोचेल. ट्रेन मुरादाबाद जंक्शनवर सकाळी 8:35 वाजता पाच मिनिटे आणि बरेली जंक्शनवर 9:56 वाजता दोन मिनिटे थांबेल.

परतीच्या प्रवासात, ट्रेन चारबाग रेल्वे स्थानकावरून दुपारी 2:45 वाजता निघेल आणि 6:02 वाजता बरेली जंक्शन, 7:32 वाजता मुरादाबाद जंक्शन येथे पोहोचेल आणि शेवटी 10 वाजता मेरठ शहरात तिचा प्रवास संपेल. ही ट्रेन मंगळवार वगळता आठवड्यातून सहा दिवस चालेल आणि तिला आठ डबे असतील.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe