पुणे मुंबई नागपूर सोलापूर मधून वंदे भारत ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मिळणार दिलासा, तिकिटाचे दर कमी होणार? रेल्वेमंत्री म्हणतात..

राज्यातील 11 महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू असून यामुळे मुंबई, पुणे, नागपूर, सोलापूर मधील रेल्वे प्रवाशांचा प्रवास वेगवान झाला आहे. अशातच आता वंदे भारत एक्सप्रेसच्या तिकीट दराबाबत केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडून महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या गाडीचे तिकीट दर कमी होणार की नाही याबाबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मोठी माहिती दिली आहे.

Published on -

Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेस संदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. खरे तर वंदे भारत एक्सप्रेस 2019 मध्ये सुरू झालेली भारतातील पहिली सेमी हाय स्पीड ट्रेन. या गाडीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या देखील फारच उल्लेखनीय आहे.

राज्यातील 11 महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू असून यामुळे मुंबई, पुणे, नागपूर, सोलापूर मधील रेल्वे प्रवाशांचा प्रवास वेगवान झाला आहे. मात्र या गाडीचे तिकीट दर हे इतर एक्सप्रेस ट्रेनच्या तुलनेत फारच अधिक आहेत.

त्यामुळे या गाडीवरून सरकारला सातत्याने घेरले जाते, तसेच या गाडीचे तिकीट दर कमी करण्याची सूद्धा मागणी उपस्थित केली जात आहे. लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून देखील या गाडीचे तिकीट दर कमी करण्याबाबत सरकारला प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

अशातच आता वंदे भारत एक्सप्रेसच्या तिकीट दराबाबत केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडून महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या गाडीचे तिकीट दर कमी होणार की नाही याबाबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मोठी माहिती दिली आहे.

काय म्हणालेत रेल्वेमंत्री?

आम्ही आपणास सांगू इच्छितो की आज वंदे भारतच्या भाड्याबाबत काँग्रेस खासदार रकीबुल हुसैन यांनी प्रश्न उपस्थित केला. खासदार हुसेन यांनी सरकारने वंदे भारत एक्सप्रेसचे भाडे कमी करण्याचा विचार केला आहे का जेणेकरून ही प्रीमियम ट्रेन सेवा लोकसंख्येच्या मोठ्या वर्गाला, विशेषतः कमी उत्पन्न गटाला अधिक परवडेल, असा प्रश्न विचारला होता.

यावर उत्तर देताना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी, भारतीय रेल्वे सेवेचा खर्च, सेवेचे मूल्य, प्रवाशांची परवडणारी क्षमता आणि इतर साधने, सामाजिक-आर्थिक विचार लक्षात घेऊन भाडे निश्चित करते, असं स्पष्टीकरण दिले आहे.

वेगवेगळ्या गाड्या/वर्गांचे भाडे या गाड्यांमध्ये देण्यात येणाऱ्या सुविधांवर आधारित असते. भारतीय रेल्वे विविध प्रकारच्या प्रवाशांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी विविध प्रकारच्या रेल्वे सेवा चालवते. वंदे भारत गाड्यांसह प्रवासी भाड्याचे मूल्यांकन ही एक सतत आणि चालू राहणारी प्रक्रिया आहे.

पण, सर्वसामान्य जनतेसाठी अलिकडेच भारतीय रेल्वेने अमृत भारत सेवा सुरू केली आहे. या सेवा पूर्णपणे नॉन-एसी गाड्या आहेत अन त्यात सर्व प्रकारच्या सोयी सुविधा असल्याचे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केले आहे.

एकंदरीत वंदे भारत एक्सप्रेस मध्ये देण्यात आलेल्या सोयीसुविधांचा विचार करून या ट्रेनचे तिकीट दर ठरवण्यात आले असल्याचे अश्विनी वैष्णव यांनी सांगितले आहे. तसेच या गाडीचे तिकीट दर कमी करण्याबाबत सरकार दरबारी सध्या कोणताच प्रस्ताव विचाराधीन नसल्याचे रेल्वेमंत्र्यांच्या विधानावरून स्पष्ट होत आहे.

महाराष्ट्रात किती वंदे भारत एक्सप्रेस

भारतातील अनेक महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू आहे. महाराष्ट्राबाबत बोलायचं झालं तर राज्याला आतापर्यंत अकरा वंदे भारत ट्रेनची भेट मिळालेली आहे.

राज्यातील सीएसएमटी ते सोलापूर, सीएसएमटी ते शिर्डी, सीएसएमटी ते जालना, सीएसएमटी ते मडगाव, मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद, नागपूर ते बिलासपुर, नागपूर ते इंदोर, नागपूर ते सिकंदराबाद, पुणे ते कोल्हापूर आणि पुणे ते हुबळी या मार्गांवर ही गाडी सुरू आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe