Vande Bharat Express : महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे राज्याला आणखी एका नव्या वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार असल्याचे वृत्त हाती आले आहे. सध्या महाराष्ट्रात 11 वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहेत.
राज्यातील सीएसएमटी ते सोलापूर, सीएसएमटी ते शिर्डी, सीएसएमटी ते मडगाव, सीएसएमटी ते जालना, मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद, नागपूर ते बिलासपूर, नागपूर ते इंदोर, नागपूर ते सिकंदराबाद, पुणे ते कोल्हापूर आणि पुणे ते हुबळी या मार्गांवर वंदे भारत ट्रेन सुरू आहे.

वंदे भारत एक्सप्रेस मुळे राज्यातील रेल्वे प्रवाशांचा प्रवास हा फारच वेगवान झाला असून आता याच एक्सप्रेस ट्रेन बाबत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार भारतीय रेल्वे मुंबई आणि कर्नाटकातील मंगलुरू यांना थेट जोडणारी वंदे भारत एक्सप्रेस सेवा लवकरच सुरू करू शकते.
या अनुषंगाने आवश्यक तयारी सुद्धा रेल्वे कडून सुरू करण्यात आली आहे. सध्या सुरू असलेल्या मुंबई-गोवा आणि गोवा-मंगलुरू वंदे भारत सेवा एकत्रित करून ही नवीन सेवा चालवली जाणार अशी शक्यता आहे.
म्हणजेच मुंबईहून गोवा दरम्यान धावणारी गाडी थेट मंगलुरुपर्यंत धावणार आहे. आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की सध्या मुंबई-गोवा आणि मंगलुरू-गोवा या दोन कमी अंतरावरील वंदे भारत गाड्यांमध्ये प्रवासी संख्या फारच कमी आहे. या गाड्यांमध्ये सरासरी 70 टक्केच प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती समोर येत आहे.
मात्र मुंबई आणि मंगलुरू यामधील गाड्यांमध्ये तसेच केरळकडे जाणाऱ्या गाड्यांमध्ये प्रवासी क्षमतेचा पूर्ण वापर होत असल्याने, ही नवी थेट सेवा सुरू केल्यास वंदे भारत एक्सप्रेसच्या क्षमतेचा अधिक चांगला उपयोग होईल, असा रेल्वे प्रशासनाचा विश्वास असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, जर ही सेवा सुरू झाली तर सध्या सकाळी 5 वाजून पंचवीस मिनिटांनी सुटणारी मुंबई-गोवा वंदे भारत गाडी आता संध्याकाळी 6 वाजता मंगलुरूला पोहोचणार असल्याची माहिती समोर आली आहे.
तसेच सकाळी साडेआठ वाजता सुटणारी मंगलुरू-गोवा वंदे भारत आता रात्री 9 वाजता थेट मुंबईत पोहोचणार असल्याचे बोलले जात आहे. पण जर भारतीय रेल्वेने जरासा काही निर्णय घेतला तर मुंबईमधील गर्दी नियंत्रण करणे हे एक मोठे आव्हान राहणार आहे.
कारण मुंबईत रात्री 9 वाजता अनेक गाड्या येतात म्हणून राजधानीत गर्दी नियंत्रण हा मोठा मुद्दा असणार आहे. त्यामुळे जर ही गाडी सुरू करायची असेल तर रेल्वेला याच्या वेळापत्रकात बदल करावा लागणार आहे,
महत्त्वाचे म्हणजे मीडिया रिपोर्ट्स मध्ये ही नवीन सेवा सुरू झाल्यानंतर याच्या वेळापत्रकात थोडा बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान जर ही नवीन सेवा सुरू झाली तर मुंबई ते मंगळुरू हा प्रवास अवघ्या बारा तासांमध्ये पूर्ण होणार अशी माहिती समोर आली आहे.
मुंबई येथील सीएसएमटी ते मडगाव यादरम्यान धावणारी ही ट्रेन थेट मंगळूर पर्यंत चालवली जाणार असल्याने नक्कीच या गाडीचा काही लोकांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.