मोठी बातमी ! भारतातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोणत्या शहरातून धावणार ? कसा असणार रूट ? वाचा….

देशातील रेल्वे प्रवाशांसाठी लवकरच वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू केली जाणार आहे. खरंतर सध्या सुरू असणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस चेअर कार प्रकारातील आहेत मात्र आता शयनयान प्रकारातील वंदे भारत एक्सप्रेस सुद्धा प्रवाशांसाठी सुरू केल्या जाणार आहेत.

Published on -

Vande Bharat Railway News : भारतीय रेल्वेच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांमध्ये प्रवाशांसाठी अनेक मोठमोठे निर्णय घेण्यात आले आहेत. देशातील ज्या भागांमध्ये अजून रेल्वेचा विस्तार झालेला नाही तिथे रेल्वेच्या माध्यमातून नवीन रेल्वे मार्ग विकसित केले जात आहेत.

देशात गेल्या काही वर्षांमध्ये हजारो किलोमीटर लांबीचे रेल्वे मार्ग विकसित करण्यात आले आहेत. याशिवाय वंदे भारत एक्सप्रेस सारखी हाय स्पीड ट्रेन सुद्धा रेल्वे प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्यात आले आहे. वंदे भारत एक्सप्रेस ही देशातील पहिली स्वदेशी बनावटीची सेमी हाय स्पीड ट्रेन असून या गाडीचा वेग 160 किलोमीटर प्रति तास इतका असल्याचे बोलले जाते.

यामुळे ही देशातील सर्वाधिक वेगवान ठरत असून या ट्रेनच्या आगमनामुळे भारतीय रेल्वेचा चेहरा मोहरा पूर्णपणे बदललेला असून रेल्वे प्रवाशांचा प्रवास अगदीच वेगवान आणि सुरक्षित झाला आहे. परिणामी या गाडीला प्रवाशांच्या माध्यमातून अभूतपूर्व असा प्रतिसाद दाखवला जात असून

आता हाच प्रतिसाद पाहता भारतीय रेल्वेच्या माध्यमातून वंदे भारत एक्सप्रेसचे स्लीपर वर्जन लवकरच लॉन्च केले जाणार असल्याची खात्रीलायक बातमी प्रसारमाध्यमातुन समोर येत आहे. अशा परिस्थितीत आज आपण देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन नेमकी कोणत्या मार्गांवर धावणार ? याच संदर्भातील सविस्तर आढावा घेणार आहोत.

कोणत्या मार्गावर धावणार वंदे भारत स्लीपर ट्रेन?

देशाची राष्ट्रीय राजधानी दिल्लीवरून देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू होणार असल्याची खात्रीलायक बातमी हाती आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही गाडी दिल्ली ते हावडा या मार्गावर चालवली जाणार असून या गाडीमुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास फारच वेगवान होईल अशी आशा आहे.

महत्त्वाची बाब अशी की या मार्गावर सध्या दुरांतो एक्सप्रेस आणि राजधानी एक्सप्रेस यांसारख्या वेगवान गाड्या सुरू आहेत. मात्र आता या मार्गावर वंदे भारत स्लीपर ट्रेन सुद्धा धावताना दिसणार असून यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्यांचा प्रवास आणखी आरामदायी होईल अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे.

मीडिया रिपोर्ट नुसार या मार्गावर धावणारी वंदे भारत स्लीपर ट्रेन जवळपास 1450 किमी अंतर कापणार आहे. महत्त्वाचे म्हणजे ही गाडी 160 किलोमीटर प्रतितास या वेगाने धावणार असल्याने हा प्रवास 15 तासांपेक्षा कमी वेळात पूर्ण होईल असा दावा सुद्धा केला जात आहे.

या गाडीचा वेग पाहता ही या मार्गावरील सर्वात वेगवान ट्रेन असेल असं सुद्धा जाणकार लोकांकडून सांगितले जात आहे. दिल्ली ते हावडा हा प्रवास पूर्ण करण्यासाठी राजधानी एक्सप्रेसला 17 तास आणि दुरांतो एक्सप्रेस ला जवळपास 18 तासांचा वेळ लागतो. मात्र या दोन्ही गाड्यांपेक्षा वंदे भारत स्लीपर ट्रेन जलद प्रवास करण्यास सक्षम ठरणार आहे.

कस असणार वेळापत्रक? 

देशातील पहिल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या संभाव्य वेळापत्रक बाबत बोलायचं झालं तर ही गाडी नवी दिल्लीहून संध्याकाळी 5 वाजता निघणार आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता हावडा जंक्शनला पोहोचणार आहे. तसेच ही ट्रेन हावडा जंक्शनहून संध्याकाळी 5 वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता नवी दिल्लीला पोहोचणार आहे.

तिकीट दराबाबत बोलायचं झालं तर देशातील पहिल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनने दिल्ली ते हावडा असा प्रवास करण्यासाठी प्रवाशांना 3,000 रुपयांपासून ते पाच हजार शंभर रुपयांपर्यंतचे तिकीट लागणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News