Vande Bharat Railway News : सध्या भारतात वंदे भारत एक्सप्रेसची मोठी क्रेज पाहायला मिळत आहे. ही देशातील पहिली सेमी हायस्पीड ट्रेन असून ही गाडी देशातील अनेक महत्त्वाच्या मार्गांवर सुरु आहे. ही ट्रेन सर्वप्रथम 2019 मध्ये रुळावर धावली होती. त्यानंतर या गाडीचे टप्प्याटप्प्याने देशातील इतर महत्त्वाच्या मार्गांवर संचालन सुरू झाले.
सध्या देशभरातील 65 हुन अधिक महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू आहे. महाराष्ट्राबाबत बोलायचं झालं तर राज्याला आतापर्यंत अकरा वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळाली असून लवकरच राज्याला आणखी काही नवीन वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन उपलब्ध करून दिल्या जातील अशी शक्यता आहे.

मुंबई पुणे नागपूर कोल्हापूर अशा शहरांना आगामी काळात नवीन वंदे भारत ट्रेनची भेट मिळण्याची शक्यता आहे. धुळ्याला देखील वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार असे बोलले जात आहे. अशातच, आता वंदे भारत एक्सप्रेसच्या बाबतीत एक नवं आणि अगदीच मोठ अपडेट हाती आल आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आग्रा शहराला लवकरच तीन वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे. येत्या दोन ते तीन महिन्यांत आग्रा शहराला तीन वंदे भारत ट्रेनची भेट मिळणार असा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये करण्यात आला आहे. उत्तर-मध्य रेल्वे आग्रा विभागाने यासाठी तयारी सुद्धा सुरु केली आहे.
लवकरच गाड्यांची चाचणी घेतली जाईल असं सुद्धा बोललं जात आहे. म्हणजेच, येत्या काळात आग्राच्या लोकांचा प्रवास आणखी सोपा आणि सोयीस्कर होणार आहे. सध्या आग्र्याहून चार वंदे भारत ट्रेन सुरू आहेत. दरम्यान आणखी तीन नव्या वंदे भारत ट्रेन आग्र्यातून चालवल्या जाणार असल्याची बातमी आता समोर येत आहे.
त्यामुळे आग्रा शहरातील नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे. नव्याने सुरू होणाऱ्या तीन वंदे भारत एक्सप्रेस पैकी एक गाडी लखनऊ ते इंदोर व्हाया आग्रा दरम्यान चालवली जाणार आहे. दुसरी गाडी लखनऊ ते जयपूर दरम्यान चालवली जाणार आहे आणि तिसरी गाडी हजरत निजामुद्दीन ते इंदोर दरम्यान चालवली जाणार आहे.
लखनऊ ते इंदोर हा जवळपास 847 किलोमीटर लांबीचा मार्ग असून यावर वंदे भारत ट्रेन सुरू झाल्यास प्रवाशांचा दोन ते तीन तासांचा वेळ वाचणार आहे. लखनऊ ते जयपूर हा 587 किलोमीटर लांबीचा मार्ग असून यावर वंदे भारत ट्रेन सुरू झाली तर प्रवाशांचा दोन-तीन तासांचा वेळ वाचेल.
हजरत निजामुद्दीन ते इंदोर दरम्यान प्रवास करण्यासाठी सध्या सोळा तासांचा वेळ लागतो मात्र या मार्गावर वंदे भारतरत्न सुरू झाल्यानंतर हा प्रवासाचा कालावधी 14 तासांपर्यंत कमी होणार आहे. यामुळे नक्कीच या रेल्वे मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
हे पण वाचा : मुंबईला लवकरच मिळणार नवा एक्सप्रेस वे ; ‘या’ 1,386 किलोमीटरपैकी 1,156 किलोमीटर लांबीचे काम पूर्ण, सरकारची मोठी माहिती