Vande Bharat Railway : वंदे भारत एक्सप्रेस ही 2019 मध्ये सुरू झालेली देशातील संपूर्ण स्वदेशी बनावटीची पहिली सेमी हाय स्पीड ट्रेन आहे. ही गाडी 2019 मध्ये सर्वप्रथम नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर सुरू झाली आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने देशातील इतर महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू करण्यात आली. सध्या देशातील अनेक राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहे.
महाराष्ट्रातही 11 महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू आहे. राज्यातील सीएसएमटी ते सोलापूर, सीएसएमटी ते शिर्डी, सीएसएमटी ते जालना, सीएसटी ते मडगाव, मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद, नागपूर ते बिलासपुर, नागपूर ते इंदोर, नागपूर ते सिकंदराबाद, पुणे ते कोल्हापूर आणि पुणे ते हुबळी या मार्गांवर ही गाडी सुरू आहे.

महाराष्ट्रात सुरू असणाऱ्या या वंदे भारत एक्सप्रेस मुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील रेल्वे प्रवाशांचा प्रवास जलद आणि सुरक्षित झाला आहे. दरम्यान आता महाराष्ट्रातील आणखी दोन महत्त्वाच्या जिल्ह्यांना वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार असल्याची बातमी सरकारकडून समोर आली आहे.
या दोन जिल्ह्यांना मिळणार वंदे भारत एक्सप्रेसची भेट
महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि खासदार अशोक चव्हाण यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रातील परभणी आणि नांदेड या दोन जिल्ह्यांना वंदे भारत एक्सप्रेस ची भेट मिळणार आहे.
खरंतर रेल्वे कडून मुंबई ते जालना या मार्गावर चालवले जाणारी वंदे भारत ट्रेन आता थेट नांदेड पर्यंत चालवली जाणार आहे. मुंबई नांदेड वंदे भारत एक्सप्रेस 26 ऑगस्ट 2025 पासून सुरू होणार अशी माहिती खासदार अशोक चव्हाण यांनी दिली आहे.
खासदार अशोक चव्हाण यांनी आपल्या एक्स हॅण्डलवर मुंबई-नांदेड वंदे भारत एक्सप्रेसचा मुहूर्त ठरला ! 26 ऑगस्ट 2025 ला मुंबई नांदेड वंदे भारत एक्सप्रेस चे उद्घाटन होणार. या ट्रेनच्या जल्लोषात स्वागतासाठी नांदेडकर सज्ज आहेत.
मोदी सरकारचे आभार. नांदेडकरांचे अभिनंदन ! अशा शब्दात मुंबई – नांदेड वंदे भारत एक्सप्रेसची माहिती दिली आहे. म्हणूनच आता आपण मुंबई – नांदेड वंदे भारत एक्सप्रेसचे वेळापत्रक तसेच ही गाडी कोणकोणत्या स्थानकावर थांबा घेणाऱ्याची माहिती पाहुयात.
मुंबई – नांदेड वंदे भारत एक्सप्रेसचे वेळापत्रक कसे राहणार?
नांदेड – मुंबई वंदे भारत एक्सप्रेस सकाळी 5 वाजता नांदेड स्थानकावरून सोडली जाणार आहे आणि त्यानंतर ही गाडी त्याच दिवशी दुपारी दोन वाजून 25 मिनिटांनी सीएसएमटीला पोहोचणार आहे. सीएसएमटी रेल्वे स्थानकावरून वंदे भारत एक वाजून दहा मिनिटांनी सोडली जाणार आहे आणि त्याच दिवशी ही गाडी रात्री दहा वाजून पन्नास मिनिटांनी नांदेड रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे.
कोण कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार
मुंबई – नांदेड वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनमुळे मराठवाड्यातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. ही गाडी या मार्गावरील परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, ठाणे आणि दादर या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे.