मोठी बातमी! डिसेंबर 2025 पर्यंत पुण्यावरून ‘या’ शहरासाठी सुरू होणार वंदे भारत एक्सप्रेस, महाराष्ट्रातील 4 जिल्ह्यांना फायदा

महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. राज्यातील चार जिल्ह्यांना जोडणारी वंदे भारत ट्रेन सुरू होणार आहे. 

Published on -

Vande Bharat Railway : वंदे भारत एक्सप्रेस ही देशातील संपूर्ण स्वदेशी बनावटीची पहिली सेमी हाय स्पीड ट्रेन. ही गाडी नेहमीच चर्चेत राहते. कधी आपल्या वेगामुळे, तर कधी दगडफेकीमुळे, तर कधी अधिक तिकीट दरामुळे या गाडीची चर्चा सुरूच असते. ही गाडी महाराष्ट्रातील 11 महत्त्वाच्या मार्गांवर सुरू आहे.

राज्यातील सीएसएमटी ते सोलापूर, सीएसएमटी ते शिर्डी, सीएसएमटी ते जालना, सीएसटी ते मडगाव, मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद, नागपूर ते बिलासपूर, नागपूर ते सिकंदराबाद, नागपूर ते इंदोर, पुणे ते कोल्हापूर आणि पुणे ते हुबळी या 11 मार्गांवर ही गाडी सुरू आहे.

म्हणजेच महाराष्ट्राला आतापर्यंत 22 वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनची भेट मिळालेली आहे. दुसरीकडे आता महाराष्ट्रातल्या आणखी एका महत्त्वाच्या मार्गावर ही गाडी सुरू होणार असल्याची बातमी समोर आली आहे. यामुळे महाराष्ट्रातील या गाड्यांची संख्या 24 वर पोहोचणार आहे.

कोणत्या मार्गावर धावणार वंदे भारत ट्रेन?

मीडिया रिपोर्टनुसार राज्याची सांस्कृतिक राजधानी पुणे ते मराठवाड्यातील नांदेड यादरम्यान वंदे भारत ट्रेन धावणार आहे. ही गाडी डिसेंबर 2025 पर्यंत रुळावर धावेल अशी माहिती समोर आली आहे. खरंतर मराठवाड्यासाठी पुणे एक प्रमुख व्यावसायिक आणि शैक्षणिक केंद्र बनले आहे.

पुण्यात मराठवाड्यातील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. याशिवाय नोकरीला देखील मराठवाड्यातील हजारो नागरिक पुण्यात स्थायिक झाले आहेत. यामुळे मराठवाड्यातील विद्यार्थी नोकरदार वर्ग मोठ्या प्रमाणात पुण्यात ये-जा करत असतात.

मात्र सध्या स्थितीला नांदेड ते पुणे दरम्यान एकही दैनंदिन एक्सप्रेस ट्रेन सुरू नाही. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय. हेच कारण आहे की लातूर, धाराशिव मार्गे नांदेड – पुणे – नांदेड वंदे भारत ट्रेन सुरू करण्याची मागणी उपस्थित करण्यात आली होती.

खासदार रवींद्र वसंतराव चव्हाण यांनी ही मागणी उपस्थित केली होती. यासाठी खासदार चव्हाण यांनी रेल्वे मंत्र्यांना निवेदन सुद्धा दिले होते. दरम्यान आता खासदार चव्हाण यांच्या या मागणीवर रेल्वे मंत्रालयाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. 

वंदे भारत एक्सप्रेस चालवण्यासाठी कॉर्ड लाईनचे काम केले जाणार

मिळालेल्या माहितीनुसार डिसेंबर 2025 पर्यंत या मार्गावरील दोन महत्त्वाच्या स्थानकांवर कॉर्ड लाईन विकसित करण्यात येणार आहे. लातूर रोड रेल्वे स्थानक आणि परळी वैजनाथ रेल्वे स्थानकावर इंजिन बदलण्याचा वेळ कमी करण्यासाठी कॉर्ड लाइन विकसित केली जाणार आहे.

रेल्वेच्या या निर्णयामुळे या मार्गावर धावणाऱ्या दहा ते बारा रेल्वे गाड्यांना फायदा होणार आहे. यामुळे प्रवासाचा वेळ कमी होणार आणि रेल्वेच्या आर्थिक खर्चात बचत होणार आहे. त्यामुळे भविष्यात या मार्गावर वंदे भारत ट्रेन सुरू होण्याचा मार्ग सुद्धा मोकळा होईल अशी आशा आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!