Vande Bharat Railway : वंदे भारत एक्सप्रेस ही देशातील पहिली सेमी हायस्पीड ट्रेन आहे. ही ट्रेन 2019 मध्ये रुळावर धावली. पहिल्यांदा ही गाडी नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर चालवली गेली आणि त्यानंतर मग देशातील इतर महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू झाली.
सध्या ही गाडी देशातील तब्बल 76 हुन अधिक महत्त्वाच्या मार्गांवर सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. आपल्या महाराष्ट्राबाबत बोलायचं झालं तर राज्याला आत्तापर्यंत 11 वंदे भारत एक्सप्रेस ची भेट मिळाली असून आगामी काळात देशातील इतरही महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू होणार आहे.

अशातच आता वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन बाबत एक महत्त्वाचे अपडेट हाती आली आहे ती म्हणजे देशाला आणखी एक नवीन वंदे भारत एक्सप्रेस ची भेट मिळण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार बिहारची राजधानी पटना येथे स्थित पाटलीपुत्र रेल्वे स्थानक ते गोरखपूर रेल्वे स्थानकादरम्यान नवीन वंदे भारत एक्सप्रेस सुरू होण्याची शक्यता असून या अनुषंगाने आवश्यक प्रक्रिया सुद्धा आता युद्ध पातळीवर सुरू झाली आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की पटना ते गोरखपुर या दोन्ही स्थानकादरम्यानचे रेल्वे मार्गाचे अंतर 397 किलोमीटर इतके असून सध्या या मार्गावर ज्या गाड्या सुरू आहेत त्यांना प्रवासासाठी जवळपास आठ ते दहा तासांचा काळ लागतो. या मार्गावर सध्या तीन एक्सप्रेस ट्रेन सुरू आहेत आणि या गाड्यांमधून प्रवास करताना प्रवाशांना अधिकचा वेळ खर्च करावा लागतोय.
हेच कारण आहे की या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून उपस्थित केली जात होती आणि आता या मागणीवर रेल्वे बोर्डाकडून सकारात्मक निर्णय घेतला गेला असल्याचे समजते. त्यामुळे आगामी काळात या मार्गावर आपल्याला वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन प्रत्यक्षात धावताना दिसणार असून यामुळे गोरखपुर ते पाटलीपुत्र हा प्रवास फारच वेगवान होणार आहे.
महत्त्वाची बाब अशी की वंदे भारत एक्सप्रेस हा प्रवास अवघ्या पाच तासात पूर्ण करण्याची क्षमता ठेवते. अर्थातच प्रवाशांचा तीन ते साडेपाच तासांचा काळ वाचणार आहे. नव्याने सुरू केल्या जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस चा रूट बाबत बोलायचं झालं तर पाटलीपुत्र जंक्शन येथून सुटणारी वंदे भारत ट्रेन
शीतलपूर, खैरा, मशरक, गोपालगंज, थावे जंक्शन, कप्तानगंज जंक्शन या मार्गे थेट गोरखपूरला जाणार आहे. आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की सध्या पटना येथून पाच शहरांसाठी वंदे भारत एक्सप्रेस धावत असून ही गाडी सुरू झाल्यास ही संख्या सहा वर पोहोचणार आहे.