रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज ! एक-दोन नाही तर तब्बल 10 मार्गांवर सुरू होणार वंदे भारत, तुमच्या जिल्ह्याला मिळणार का लाभ ?

वंदे भारत एक्सप्रेसच्या संदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. वंदे भारत एक्सप्रेस 2019 मध्ये सुरू झालेली देशातील स्वदेशी बनावटीची पहिली सेमी हायस्पीड ट्रेन आहे आणि ही गाडी येत्या काही दिवसांनी आणखी काही महत्त्वाच्या मार्गांवर सुरू होणार आहे. 

Published on -

Vande Bharat Railway : सध्या संपूर्ण देशात वंदे भारत एक्सप्रेसच्या मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहेत. खरं तर ही गाडी 2019 मध्ये सुरू झाली आहे मात्र आजही चर्चेत राहते यात शंकाच नाही. कधी ही गाडी आपल्या जागतिक दर्जाच्या सोयी सुविधांमुळे चर्चेत राहते, तर कधी या गाडीवर होणाऱ्या दगडफेकीमुळे, तर कधी महागड्या तिकीट दरामुळे. या गाडीचे तिकीट दर हे नक्कीच सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचे आहेत.

पण असे असतानाही या गाडीला जबरदस्त प्रतिसाद मिळतोय, ही गोष्ट नाकारून सुद्धा चालणार नाही. सध्या स्थितीला ही गाडी देशातील अनेक महत्त्वाच्या राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सुरू आहे.

आपल्या महाराष्ट्राबाबत बोलायचं झालं तर राज्यात एकूण 11 वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहेत आणि लवकरच पुणे ते नागपूर आणि मुंबई ते नागपूर या दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरू होण्याची शक्यता आहे.

वंदे भारत एक्सप्रेसला एवढा छान प्रतिसाद मिळत असल्याने आता रेल्वे कडून वंदे भारत स्लीपर ट्रेन देखील सुरू केल्या जाणार आहेत. दरम्यान याच वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या संदर्भात एक नवीन माहिती हाती आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देशभरातील तब्बल दहा महत्त्वाच्या मार्गांवर वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू होण्याची शक्यता आहे.

कशी असणार वंदे भारत स्लीपर ट्रेन? 

सध्या देशात जी वंदे भारत सुरू आहे ती चेअर कार प्रकारातील आहे मात्र आता शयनयान प्रकारातील वंदे भारत सुरू होणार आहे. वंदे भारत स्लीपर ट्रेन ही 16 कोचची असेल आणि यात जवळपास 823 प्रवासी प्रवास करू शकतात.

या चालू आर्थिक वर्षात म्हणजेच आर्थिक वर्ष 2025 – 26 मध्ये वंदे भारत स्लीपर ट्रेन प्रत्यक्षात रुळावर धावण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रेल्वे मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माध्यमातूनच ही बातमी समोर आली आहे.

या चालू आर्थिक वर्षात वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्यासाठी आवश्यक ती कारवाई रेल्वे कडून सुरू करण्यात आली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की वंदे भारत स्लीपर ट्रेन बीईएमएल (BEML), काइननेट रेल्वे सॉल्यूशन्स लिमिटेड (Kinet Railway Solutions Ltd),

आणि टिटागज रेल्वे सिस्टम्स लिमिटेड आणि भेल (BHEL) च्या सहभागाने बनवल्या जात आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे या कंपन्यांकडून 200 पेक्षा अधिक कोणते भारत स्लीपर ट्रेनचे उत्पादन होणार आहे.

या मार्गांवर धावणार वंदे भारत स्लीपर

दरम्यान, ही बहुचर्चीत वंदे भारत स्लीपर चालू आर्थिक वर्षात रुळावर धावण्याची शक्यता असून या आर्थिक वर्षात जवळपास दहा मार्गांवर ही गाडी धावू शकते असे बोलले जात आहे. महत्त्वाची बाब अशी की महाराष्ट्रातील मुंबई आणि पुण्याला देखील वंदे भारत स्लीपरची भेट मिळणार आहे.

मीडिया रिपोर्ट नुसार, नवी दिल्ली-हावडा, सियालदाह-नवी दिल्ली, नवी दिल्ली-पुणे, नवी दिल्ली-मुंबई आणि नवी दिल्ली-सिकंदराबाद अशा काही महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी चालवली जाणार आहे.

तथापि ही गाडी कोणत्या मार्गांवर धावणार ? याबाबतची अधिकृत माहिती अजूनही हाती आलेली नाही. यामुळे ही गाडी कोणकोणत्या मार्गांवर धावणार हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News