एप्रिल ते डिसेंबर 2025 दरम्यान भारतात सुरू होणार 9 वंदे भारत एक्सप्रेस ! कोणकोणत्या शहरांना मिळणार भेट? वाचा…

सध्या भारतात ज्या वंदे भारत ट्रेन सुरू आहेत त्या चेअर कार प्रकारातील आहेत. मात्र लवकरच देशातील रेल्वे प्रवाशांसाठी स्लीपर वंदे भारत ट्रेन सुरू केल्या जाणार आहेत. पण आता याच स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस बाबत एक नवीन अपडेट समोर आले आहे.

Published on -

Vande Bharat Sleeper Train : वंदे भारत एक्सप्रेस ही देशातील संपूर्ण भारतीय बनावटीची पहिली हाय स्पीड ट्रेन. या गाडीचा वेग हा 160 किलोमीटर प्रति तास इतका आहे. सध्या स्थितीला ही गाडी देशातील निम्म्याहून अधिक राज्यांमध्ये सुरू आहे. काश्मीर खोऱ्याला देखील लवकरच वंदे भारत ट्रेनची भेट मिळणार आहे.

आपल्या महाराष्ट्राबाबत बोलायचं झालं तर राज्याला आत्तापर्यंत 11 वंदे भारत गाड्या सुरु आहेत. ही ट्रेन सध्या देशभरातील बहुतेक राज्यांमध्ये चालू आहे. सध्या भारतात ज्या वंदे भारत ट्रेन सुरू आहेत त्या चेअर कार प्रकारातील आहेत.

मात्र लवकरच देशातील रेल्वे प्रवाशांसाठी स्लीपर वंदे भारत ट्रेन सुरू केल्या जाणार आहेत. खरे तर गेल्या अनेक महिन्यांपासून या गाडीच्या चर्चा सुरू आहेत, म्हणून प्रवाशांच्या माध्यमातून स्लीपर वंदे भारतची उत्सुकतेने वाट पाहिली जात आहे.

यापूर्वी असे म्हटले जात होते की, देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन जानेवारी किंवा फेब्रुवारीपासून सुरू होऊ शकते. मात्र आता मार्च महिना उलटत चालला आहे, परंतु स्लीपर वंदे भारत अजूनही रुळावर आलेली नाही.

पण आता याच स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस बाबत एक नवीन अपडेट समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वंदे भारत स्लीपर ट्रेन सीसीआरएसच्या मुख्य आयुक्तांच्या मंजुरीनंतर सुरू केली जाईल असे म्हटले जात आहे.

सीसीआरएसकडून या गाडीची लवकरच पाहणी केली जाणार आहे. याद्वारे, ट्रेनच्या तांत्रिक मापदंडांची चाचणी केली जाईल अन मग चीफ कमिशनर ऑफ रेल्वे सेफ्टी म्हणजेच सीसीआरएसकडून या गाडीला मंजुरी दिली जाईल आणि हे काम मार्च महिन्याच्या अखेरीस ही गाडी सुरु होऊ शकते.

यानंतर मग सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांना स्लीपर वंदे भारत ट्रेनची भेट मिळणार आहे. स्लीपर वंदे भारत लॉन्च करण्यापूर्वी सीसीआरएस त्याची चौकशी करतील आणि या गाडीची तपासणी पूर्ण झाल्यानंतर मार्च महिन्यातचं त्यांच्याकडून या गाडीला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.

म्हणजेच हे स्पष्ट झाले आहे की स्लीपर वंदे भारत लवकरच ट्रॅकवर चालताना दिसू शकेल. याद्वारे लांब पल्ल्याचा प्रवास आरामदायी होणार आहे. खरे तर जानेवारी 2025 मध्ये वंदे भारत स्लीपर ट्रेन ची यशस्वी ट्रायल रन पूर्ण झाली आहे.

देशातील विविध मार्गांवर या गाडीची ट्रायल रन घेण्यात आली असून आता एप्रिल 2025 ते डिसेंबर 2025 या काळात देशातील जवळपास नऊ महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीचे संचालन सुरू होणार असल्याची बातमी एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट मधून समोर आली आहे.

वंदे भारत स्लीपर ट्रेन नेमक्या कोणत्या मार्गांवर धावणार याबाबत अजून कोणतीच अपडेट हाती आलेली नाही. परंतु दिल्ली ते मुंबई, पुणे ते मुंबई अशा मार्गांवर या गाडीचे संचालन सुरू होण्याची शक्यता आहे. ही गाडी पुणे मुंबई नागपूर दिल्ली कोलकत्ता वाराणसी अहमदाबाद गांधीनगर यांसारख्या मोठ्या शहरांमधून सुरू होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe