Vande Bharat Sleeper Train : वंदे भारत स्लीपर संदर्भात एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. खरे तर सध्या देशात चेअरकार प्रकारातील वंदे भारत सुरू आहेत आणि या गाड्यांना प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद पण मिळतोय.
देशातील जवळपास सर्वच राज्यांमध्ये वंदे भारत ट्रेन सुरू आहेत. महाराष्ट्राला सुद्धा आत्तापर्यंत एकूण बारा वंदे भारत एक्सप्रेस ची भेट मिळाली आहे आणि लवकरच राज्याला तेरावे गाडी मिळू शकते असा अंदाज आहे.

अशातच आता लोकसभेतून वंदे भारत एक्सप्रेसच्या स्लीपर वर्जन बाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्लीपर वंदे भारत ट्रेन संदर्भात केंद्रीय विधिमंडळाच्या अधिवेशनात महत्त्वाची माहिती दिली आहे.
लोकसभेत एका लेखी प्रश्नाच्या उत्तरात केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी स्लीपर वंदे भारत लांब आणि मध्यम अंतरावर चालवली जाईल असे सांगितले. ही गाडी रात्रीच्या प्रवासासाठी डिझाइन करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली आहे.
महत्वाची बाब म्हणजे स्लीपर वंदे भारतच्या दोन रेकची निर्मिती करण्यात आली असून ही ट्रेन लवकरच प्रवाशांच्या सेवेत येणार असा दावा पण करण्यात आला आहे. स्लीपर वंदे भारतमध्ये कवच प्रणाली आहे.
तसेच सर्व कोचमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. धोक्याच्या परिस्थितीत प्रवाशांसाठी आणि ट्रेन व्यवस्थापक/लोको पायलटसाठी आपत्कालीन संप्रेषण प्रणाली सुद्धा देण्यात आली आहे. थोडक्यात रेल्वेमंत्र्यांनी देशाला लवकरच स्लीपर वंदे भारतची भेट मिळणार असे सांगितले आहे.
1 हजार किलोमीटरचा प्रवास फक्त 8 तासात
भारतीय रेल्वे लवकर स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस लॉन्च करणार आहे. चाचणी पूर्ण झाल्यानंतर वंदे भारत स्लीपर प्रत्यक्षात रुळावर धावताना दिसणार आहे. या महिन्यात किंवा 2026 च्या सुरुवातीला ही गाडी रुळावर धावणार अन सुरुवातीला पटना ते दिल्ली या मार्गावर ही गाडी सुरू होऊ शकते असा कयास बांधला जात आहे.
दिल्ली ते पटना हे 1000 किलोमीटरचे अंतर आहे. या अंतरावर ही गाडी सुरू झाल्यास दिल्ली ते पटना हा प्रवास आठ तासात पूर्ण होऊ शकतो. यामुळे बिहार मधील जनतेला जलद गतीने दिल्लीत पोहोचता येणे शक्य होणार आहे.
एक हजार किलोमीटरचा प्रवास या गाडीने केवळ आठ तासांमध्ये पूर्ण होईल आणि पटना शहरातील नागरिकांसाठी ही एक मोठी भेट ठरणार आहे. मात्र अद्याप पटना ते दिल्ली या मार्गावर स्लीपर वंदे भारत सुरू होणार की नाही याबाबत रेल्वे कडून कोणतीच माहिती समोर आलेली नाही.
तसेच या गाडीचे वेळापत्रक, तिकीट दर कसे असणार या संदर्भातही काहीच माहिती अजून उघड झालेली नाही. पण मीडिया रिपोर्ट मध्ये या गाडीचे तिकीट दर राजधानी प्रमाणेच राहणार असा दावा होतोय.













