रेल्वे प्रवाशांसाठी आत्ताची सर्वात मोठी बातमी! रेल्वे मंत्रालयाकडून वंदे भारत स्लीपर ट्रेनला मंजुरी, कधी धावणार नवीन ट्रेन ? 

Published on -

Vande Bharat Sleeper Train : स्वातंत्र्यपूर्व पासून भारतात रेल्वे सुरू आहे. मात्र रेल्वेचा चेहरा मोहरा स्वातंत्र्यानंतरच बदलला आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे कडून राजधानी शताब्दी अशा एक्सप्रेस गाड्या चालवल्या जात आहेत. याशिवाय 2019 पासून वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन देखील सुरू करण्यात आली आहे.

ही गाडी चेअर कार प्रकारातील असून कमाल 160 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावणारी ही गाडी देशातील विविध मार्गांवर सुरू आहे. विशेष म्हणजे या गाडीला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय. सुरक्षित, जलद आणि आरामदायी प्रवासामुळे तसेच प्रवाशांना मिळणाऱ्या वर्ल्ड क्लास सोयी सुविधांमुळे ही गाडी नेहमीच चर्चेत राहिली आहे.

दरम्यान आता या गाडीचे स्लीपर वर्जन सुद्धा लवकरच लॉन्च होणार असल्याची बातमी समोर येत आहे. यामुळे भारतात रेल्वे प्रवासाचा अनुभव एका नव्या उंचीवर पोहोचणार आहे. खरे तर वंदे भारत स्लीपर ट्रेन ची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे.

मध्यंतरी या गाडीचे फोटो देखील सोशल मीडियामध्ये व्हायरल झाले होते. दरम्यान आता रेल्वे मंत्रालयाने भारतातील पहिल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनला मंजुरी दिली आहे. ही गाडी 16 डब्यांची आहे आणि गाडीचा वेग 160 किलोमीटर प्रतितास इतका आहे.

आता या नव्या स्लीपर ट्रेनला मंजुरी मिळाली असल्याने लवकरच ही गाडी प्रवाशांसाठी सुरू होणार असल्याची अशा व्यक्त करण्यात आली आहे. ही गाडी लांब पल्ल्याच्या मार्गावर चालवली जाणार आहे. सध्याची वंदे भारत सुरू आहे ती रात्रीच्या वेळी धावत नाही.

परंतु नवीन वंदे भारत स्लीपर ट्रेन रात्री सुद्धा धावेल. या गाडीतून प्रवाशांना झोपून प्रवास करता येणे शक्य होणार आहे. यामुळे प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होईल शिवाय कितीही लांबचा प्रवास असला तरी देखील प्रवाशांना आरामदायी प्रवासाचा अनुभव घेता येईल.

हे स्लीपर वर्जन चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF) द्वारे स्वदेशी पद्धतीने तयार करण्यात आले आहे. दरम्यान रेल्वे मंत्रालयाने सर्व झोनल रेल्वे महाव्यवस्थापकांना ही हाय-स्पीड ट्रेन केवळ सर्वोच्च मानकांनुसार राखलेल्या ट्रॅकवरच चालवण्यात यावी असे स्पष्ट निर्देश दिले आहेत.

या ट्रॅकवर भारतीय रेल्वेच्या स्थायी मार्गदर्शक तत्त्वांच्या परिच्छेद 522 चे काटेकोरपणे पालन करावे लागेल. हाय-स्पीड ट्रेनची स्थिरता आणि प्रवाशांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी हा नियम आवश्यक असल्याचे रेल्वे कडून स्पष्ट करण्यात आले आहे. म्हणजेच प्रवाशांची सुरक्षितता रेल्वेने सर्वोच्च स्थानी ठेवली आहे.

सुरतमधून जाणारा मुंबई-दिल्ली रेल्वे ट्रॅक आधीच या मानकांनुसार विकसित करण्यात आला आहे. यावरून ही गाडी मुंबई दिल्ली रेल्वे मार्गावर धावणार असा विश्वास व्यक्त होतोय. अद्याप याची अधिकृत घोषणा झालेली नाही पण मुंबई – दिल्ली रेल्वे मार्गावर वंदे भारत स्लीपर ट्रेन चालवण्याचा रेल्वे कडून नक्कीच विचार होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News