Vande Bharat Sleeper Train : 2019 मध्ये भारतीय रेल्वेने वंदे भारत एक्सप्रेस ही संपूर्ण भारतीय बनावटीची पहिली सेमी हाय स्पीड ट्रेन प्रवाशांसाठी सुरू केली. ही गाडी सर्वप्रथम नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर धावली आणि त्यानंतर मग देशातील जवळपास सर्वच राज्यांमध्ये ही गाडी धावू लागली.
आपल्या महाराष्ट्रात सुद्धा वंदे भारत एक्सप्रेसचे यशस्वी संचालन सुरू आहे सध्या राज्यात 11 वंदे भारत गाड्या धावत आहेत आणि या गाड्यांना प्रवाशांकडून जोरदार प्रतिसाद सुद्धा मिळतोय. महत्त्वाची बाब म्हणजे वंदे भारत एक्सप्रेसच्या यशानंतर आता भारतीय रेल्वे कडून वंदे भारत स्लीपर ट्रेन सुद्धा चालवली जाणार आहे.

वंदे भारत स्लीपर ट्रेन बाबत गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चा सुरू आहेत, यामुळे ही गाडी कधी नेमकी रुळावर येणार? हा मोठा यक्षप्रश्न आहे आणि या संदर्भात आता नवीन अपडेट समोर आली आहे.
कधी सुरू होणार वंदे भारत स्लीपर?
वंदे भारत स्लीपर ट्रेन हे पुढील महिन्यात म्हणजेच ऑगस्टमध्ये रुळावर येईल अशी शक्यता आहे. ऑगस्ट अखेरपर्यंत ही गाडी भारतीय रेल्वे प्रवाशांसाठी सुरू होण्याची शक्यता रिपोर्टमध्ये वर्तवली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे मंत्रालय ऑगस्ट महिन्यापासूनच वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याच्या तयारीत आहे,
यासंदर्भात अजून रेल्वे मंत्रालयाकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही पण मीडिया रिपोर्ट मध्ये अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र पंतप्रधान कार्यालयाकडून याबाबत अंतिम निर्णय झाल्यानंतरच प्रत्यक्षात वंदे भारत सुपर ट्रेन रुळावर येणार आहे.
त्यामुळे पंतप्रधान कार्यालयाकडून या प्रस्तावाला कधी हिरवा झेंडा मिळणार हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे. या गाडीमुळे रेल्वे प्रवाशांना लांब पल्ल्याचा प्रवास देखील अगदीच आरामात करता येईल अशी आशा आहे.
भारतात सुरू होणार 200 वंदे भारत ट्रेन
मीडिया रिपोर्टनुसार, रेल्वे मंत्रालयाने एकूण 200 वंदे भारत ट्रेनसाठी निविदा जारी केलेल्या आहेत. यापैकी 120 ट्रेनचे कंत्राट हे रेल विकास निगम लिमिटेड आणि रशियन कंपनी ट्रान्समॅशहोल्डिंग यांच्या माध्यमातून तयार केल्या जाणार आहेत आणि उर्वरित 80 वंदे भारत स्लीपर ट्रेनचे कंत्राट भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड आणि टिटागड वॅगन्स यांच्या माध्यमातून तयार केल्या जातील अशी माहिती समोर आली आहे. वंदे भारत स्लीपर ट्रेन कमाल 160 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावण्यास सक्षम राहणार आहे.