Vande Bharat Ticket : आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस ला पंतप्रधानांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे. उद्यापासून ही ट्रेन प्रवाशांसाठी रोजाना सेवेत दाखल होणार आहे.
अशा परिस्थितीत आज आपण या ट्रेनसाठी प्रवाशांकडून किती तिकीट आकारलं जाईल याविषयी जाणून घेणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया या बहुमूल्य माहिती विषयी सविस्तर.

मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस चे तिकीट दर खालील प्रमाणे
या वंदे भारत ट्रेन ने मुंबईहून पुण्यापर्यंत जर प्रवास केला तर प्रवाशांना चेअर कार अर्थात सीसीसाठी 560 रुपयाच तिकीट काढावं लागणार आहे. तसेच एक्झिक्युटिव्ह चेअर अर्थात ईसीसाठी 1135 रुपये भाडं आकारण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे मंत्रालयाच्या माध्यमातून समोर येत आहे.
तसेच मुंबईहून थेट सोलापूर पर्यंत जर प्रवास करायचा असेल तर प्रवाशांना सीसी अर्थातच चेअर कार साठी 965 रुपये एवढे तिकीट काढावे लागणार आहे. ईसी अर्थातच एक्झिक्यूटिव्ह चेअरसाठी 1970 रुपयाचे तिकीट लागणार आहे.