Vande Bharat Train : पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच वेळी देशाला चार नव्या वंदे भारत एक्सप्रेसची भेट देणार आहेत. त्यामुळे देशातील वंदे भारतचे नेटवर्क आणखी मजबूत होणार आहे. खरे तर, वंदे भारत एक्सप्रेस सहा वर्षांपूर्वी अर्थात 2019 मध्ये पहिल्यांदा रुळावर धावली.
नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर पहिल्यांदा वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात आली आणि त्यानंतर मग टप्प्याटप्प्याने देशातील इतर महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू झाली. सद्यस्थितीला ही गाडी देशातील जवळपास सर्वच महत्त्वाच्या राज्यांमध्ये सुरू आहे.

आपल्या महाराष्ट्रातही जवळपास 12 जोडी वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहेत. विशेष म्हणजे राज्याला आणखी काही नवीन गाड्यांची भेट मिळणार असल्याचा दावा केला जातोय. सीएसएमटी ते सोलापूर, सीएसएमटी ते जालना, सीएसएमटी ते मडगाव,
सीएसएमटी ते शिर्डी, मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद, पुणे ते कोल्हापूर, पुणे ते हुबळी, पुणे ते नागपूर, नागपूर ते इंदोर, नागपूर ते सिकंदराबाद, नागपूर ते बिलासपूर या महत्त्वाच्या मार्गांवर वंदे भारत ट्रेन सुरू करण्यात आली आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे या वर्षी राज्यातील पुणे ते नांदेड या महत्त्वाच्या मार्गावर देखील वंदे भारतचे संचालन सुरू होणार असल्याची खात्रीलायक बातमी प्रतिष्ठित वृत्त संस्थेच्या माध्यमातून समोर आली आहे. दरम्यान उद्या शनिवारी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी चार वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झंडा दाखवणार आहेत.
बनारस-खजुराहो, लखनऊ-सहारनपूर, फिरोजपूर-दिल्ली आणि एर्नाकुलम-बेंगळुरू या मार्गांवर वंदे भारत ट्रेन सुरू करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. उद्या ते सकाळी सव्वा 8 वाजता आपल्या संसदीय क्षेत्रात जाणार आहेत.
आपल्या संसदीय क्षेत्रात अर्थातच वाराणसी मध्ये जाऊन ते चार नवीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील. या अनुषंगाने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुरुवारी येथील रेल्वे स्थानकावर तयारीचा आढावा सुद्धा घेतला आहे.
चार गाड्यांचे उदघाट्न होणार
उद्या 8 नोव्हेंबर 2025 रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी बनारस-खजुराहो, लखनौ-सहारापूर, फिरोजपूर-दिल्ली आणि एर्नाकुलम-बेंगळुरू मार्गांवरील वंदे भारत गाड्यांचे उद्घाटन करणार अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आली आहे. नक्कीच या गाड्या सुरू झाल्यामुळे प्रवाशांचा प्रवास आणखी वेगवान होणार आहे.