Vande Bharat Train : वंदे भारत एक्सप्रेस ही देशातील स्वदेशी बनावटीची पहिली हाय स्पीड ट्रेन आहे. ही गाडी सर्वप्रथम 2019 मध्ये सुरू झाली. देशातील पहिली वंदे भारत ट्रेन नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर चालवली गेली आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने देशातील इतर महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीचे संचालन सुरू झाले.
ही गाडी सुरू झाल्यानंतर प्रवाशांनी याला चांगला प्रतिसाद दाखवला असून सध्या स्थितीला देशातील असंख्य मार्गांवर ही गाडी सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार जानेवारी 2025 अखेरपर्यंत भारतात एकूण 136 वंदे भारत एक्सप्रेस धावत आहेत.

सध्या देशातील अनेक शहरांमधून आणि विभागांमधून वंदे भारत ट्रेन सुरू आहे. आतापर्यंत देशातील अनेक राज्य वंदे भारत ट्रेन सोबत जोडले गेले आहेत. यामुळे एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाणे सोयीचे झाले आहे. दरम्यान, जानेवारी 2024 पर्यंत देशात एकूण 82 वंदे भारत ट्रेन सुरू होत्या.
मात्र आता ही संख्या 136 वर पोहोचली असून देशातील अनेक प्रमुख शहरांना वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळालेली आहे. आता आपण महाराष्ट्रातील कोणत्या शहरांना वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळालेली आहे? राज्यात सध्या किती वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहेत याबाबत आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
महाराष्ट्रात किती वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहेत
मीडिया रिपोर्टनुसार 2024 मध्ये भारतीय रेल्वेने 30 पेक्षा जास्त वंदे भारत एक्सप्रेस लॉन्च केल्या आहेत. गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकाच वेळी दहा वंदे भारत एक्सप्रेस सुरू केल्या होत्या.
दरम्यान गेल्या वर्षी सुरु झालेल्या 30 वंदे भारत एक्सप्रेसच्या जोरावर 2024 अखेरपर्यंत देशातील वंदे भारत एक्सप्रेस ची संख्या 136 वर पोहोचली आहे. महाराष्ट्र बाबत बोलायचं झालं तर सध्या राज्यातील 11 महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू आहे.
गेल्या वर्षी जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकाच वेळी 10 वंदे भारत एक्सप्रेस सुरू केल्यात त्यावेळी महाराष्ट्राला सुद्धा तीन गाड्या मिळाल्या होत्या.
सध्या, अर्थात 20 मार्च 2025 पर्यंत महाराष्ट्रातील सीएसएमटी ते जालना, सीएसएमटी ते मडगाव, सीएसएमटी ते सोलापूर, सीएसएमटी ते शिर्डी, मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद, नागपूर ते बिलासपुर,
नागपूर ते इंदोर, नागपूर ते सिकंदराबाद, पुणे ते कोल्हापूर आणि पुणे ते हुबळी या अकरा मार्गांवर वंदे भारत ट्रेन धावत आहेत. यातील नागपूर ते सिकंदराबाद पुणे ते कोल्हापूर आणि पुणे ते हुबळी या गाड्या एकाच वेळी सुरू करण्यात आल्या होत्या.