महाराष्ट्राला मिळणार आणखी एका नव्या वंदे भारत ट्रेनची भेट ! कसा असणार रूट अन वेळापत्रक ? वाचा…

खरंतर सध्या महाराष्ट्रात एकूण 11 वंदे भारत ट्रेन सुरू आहेत. अशातच आता राज्याला आणखी एका नव्या गाडीची भेट मिळणार असल्याचे वृत्त हाती आले आहे. भारतीय रेल्वे लवकरच मुंबई ते मंगलोर दरम्यान नवीन वंदे भारत रेल्वे सेवा सुरू करण्याचा विचार करत असल्याचा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये करण्यात आला आहे.

Published on -

Vande Bharat Train : वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन संदर्भात एक नवीन अपडेट हाती आली आहे. राज्याला पुन्हा एक नवीन वंदे भारत ट्रेनची भेट मिळणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. खरंतर सध्या महाराष्ट्रात एकूण 11 वंदे भारत ट्रेन सुरू आहेत.

राज्यातील सीएसएमटी ते सोलापूर, सीएसएमटी ते शिर्डी, सीएसएमटी ते जालना, सीएसएमटी ते मडगाव, मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद, नागपूर ते बिलासपुर, नागपूर ते इंदोर, नागपूर ते सिकंदराबाद, पुणे ते कोल्हापूर आणि पुणे ते हुबळी या 11 मार्गांवर वंदे भारत ट्रेन सुरू करण्यात आली असून या मार्गांवरील वंदे भारत ट्रेनला प्रवाशांच्या माध्यमातून चांगला प्रतिसाद सुद्धा मिळतोय.

अशातच आता राज्याला आणखी एका नव्या गाडीची भेट मिळणार असल्याचे वृत्त हाती आले आहे. भारतीय रेल्वे लवकरच मुंबई ते मंगलोर दरम्यान नवीन वंदे भारत रेल्वे सेवा सुरू करण्याचा विचार करत असल्याचा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सध्या कार्यरत असलेल्या मुंबई-गोवा आणि मंगलोर-गोवा या दोन वंदे भारत ट्रेनला एकत्र करून ही नवीन सेवा सुरू करण्याचा रेल्वेचा मानस आहे. दरम्यान, जर रेल्वेने असा निर्णय घेतला तर या परिवर्तनामुळे कार्यक्षमतेत वाढ होईल आणि अधिक प्रवासी या मार्गावर प्रवास करतील, असा अंदाज आहे.

सध्या, मुंबई-गोवा आणि मंगलोर-गोवा या दोन्ही मार्गांवरील प्रवासी क्षमतेचा दर सरासरी 70 टक्के आहे, मात्र नव्या सेवेच्या माध्यमातून तो आणखी वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान आता आपण या दोन्ही मार्गांच्या वंदे भारत ट्रेनच्या सेवेचा एकत्रीकरणाचा निर्णय रेल्वे कडून का घेतला जातोय याचे कारण समजून घेणार आहोत तसेच मुंबई ते मंगलोर दरम्यान वंदे भारत ट्रेन सुरू झाल्यास याचे वेळापत्रक कसे राहणार याबाबतही माहिती पाहणार आहोत.

मुंबई-मेंगलोर वंदे भारत ट्रेन सुरू करण्याचे कारण काय ?

खरेतर, मंगलोर-गोवा वंदे भारत ट्रेन प्रवाशांच्या कमी प्रतिसादामुळे चर्चेत आली आहे. सध्या या ट्रेनमधील प्रवासी क्षमतेचा दर 40 टक्क्यांपेक्षाही कमी असून, त्यात सुधारणा करण्यासाठी रेल्वेने ही सेवा कोझिकोडपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव दिला होता.

मात्र, कर्नाटकातील काही राजकीय नेत्यांच्या विरोधामुळे तो प्रस्ताव रद्द करण्यात आला. सध्या मंगलोर-गोवा वंदे भारत ट्रेन सुमारे साडेचार तासांत आपला प्रवास पूर्ण करते. मुंबई-गोवा वंदे भारत ट्रेनने सुरुवातीला 90 टक्क्यांहून अधिक प्रवासी संख्या मिळवली होती, मात्र आता ती 70 टक्क्यांच्या आसपास स्थिरावली आहे.

या पार्श्वभूमीवर, रेल्वेने या दोन्ही मार्गांचे विलीनीकरण करून मुंबई ते मंगलोर थेट सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई आणि मंगलोरला जाणाऱ्या इतर गाड्यांमध्ये कायमस्वरूपी 100 टक्के प्रवासी संख्या असते, त्यामुळे हा नवीन बदल अधिक फायद्याचा ठरेल, असा रेल्वेचा विश्वास आहे. नक्कीच ही नवी गाडी सुरू झाली तर मुंबई ते मंगळूर दरम्यान प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

नव्या गाडीचे वेळापत्रक कसे राहू शकते?

सध्याच्या वेळापत्रकानुसार, मुंबई-गोवा वंदे भारत सकाळी 5:25 वाजता सुटते आणि दुपारी 1:10 वाजता गोव्यात पोहोचते. प्रस्तावित नव्या मार्गानुसार ही गाडी थेट मंगलोरपर्यंत धावल्यास ही गाडी सायंकाळी 6:00 वाजता आपल्या गंतव्यस्थानावर पोहोचणार आहे.

तसेच, मंगलोर-गोवा वंदे भारत सकाळी 8:30 वाजता सुटून दुपारी 1:10 वाजता गोव्यात पोहोचते. जर ती मुंबईपर्यंत सुरू केली गेली तर रात्री 9:00 वाजेपर्यंत ही गाडी मुंबईत पोहोचू शकते. मात्र याबाबतचा अजून अधिकृत निर्णय रेल्वे बोर्डाकडून घेतलेला नाही. यामुळे खरंच मुंबई ते मंगलोर अशी वंदे फार ट्रेन धावणार का हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe