खुशखबर ; महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी सुरू होणार नवीन वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन, हे जिल्हे जोडले जाणार, कसा असणार रूट ?

महाराष्ट्राला आणखी सहा नवीन वंदे भारत एक्सप्रेस मिळणार असल्याची बातमी समोर येत आहे. त्यामुळे राज्यातील रेल्वे प्रवाशांचा प्रवास आणखी सुपरफास्ट होणार आहे. खरंतर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन ही 2019 मध्ये सुरू झाली होती. सर्वप्रथम ही गाडी नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर सुरू झाली.

Updated on -

Vande Bharat Train : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. खरंतर, जेव्हापासून वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली आहे तेव्हापासून रेल्वे प्रवाशांचा प्रवास हा सुपरफास्ट झाला आहे. दरम्यान आता महाराष्ट्र राज्यासाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे.

महाराष्ट्राला आणखी सहा नवीन वंदे भारत एक्सप्रेस मिळणार असल्याची बातमी समोर येत आहे. त्यामुळे राज्यातील रेल्वे प्रवाशांचा प्रवास आणखी सुपरफास्ट होणार आहे. खरंतर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन ही 2019 मध्ये सुरू झाली होती.

सर्वप्रथम ही गाडी नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर सुरू झाली. यानंतर टप्प्याटप्प्याने देशातील इतर महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीला हिरवा झेंडा मिळाला. सध्या ही गाडी राज्यातील अकरा महत्त्वाच्या मार्गांवर सुरू आहे.

राज्यातील मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद सीएसएमटी ते शिर्डी सीएसएमटी ते सोलापूर सीएसएमटी ते जालना सीएसएमटी ते मडगाव नागपूर ते बिलासपूर नागपूर ते इंदोर नागपूर ते सिकंदराबाद पुणे ते कोल्हापूर आणि पुणे ते हुबळी या मार्गांवर ही गाडी सुरू आहे.

मात्र लवकरच राज्यातील वंदे भारत एक्सप्रेस ची संख्या 17 वर पोहोचण्याची शक्यता आहे. कारण की महाराष्ट्रातून आणखी सहा नवीन वंदे भारत ट्रेन सुरू होणार असून या ट्रेनचे मार्ग देखील जवळपास अंतिम झाले असल्याचे समजते.

कोणत्या मार्गावर धावणार

मीडिया रिपोर्टवर जर विश्वास ठेवला तर राज्याच्या राजधानीला अन देशाच्या आर्थिक राजधानीला अर्थातच मुंबईला आणखी दोन वंदे भारत एक्सप्रेस मिळतील. मुंबई ते कोल्हापूर आणि मुंबई ते शेगाव या मार्गावर वंदे भारत ट्रेन सुरू होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

दुसरीकडे राज्याच्या सांस्कृतिक राजधानीला देखील आणखी चार गाड्या मिळणार आहेत. सांस्कृतिक राजधानी पुणे ते शेगाव, पुणे ते बेळगाव, पुणे ते बडोदा आणि पुणे ते सिकंदराबाद या मार्गांवर वंदे भारत ट्रेन सुरू होण्याची दाट शक्यता असल्याचा दावा केला जात आहे.

मुंबईला आत्तापर्यंत सहा वंदे भारत एक्सप्रेस मिळाल्या आहेत, जर या दोन मार्गांवर ही वंदे भारत ट्रेन सुरू झाली तर मुंबईमधील या हायस्पीड ट्रेनची संख्या आठ वर जाणार आहे. पुण्याला देखील आत्तापर्यंत तीन गाड्यांची भेट मिळाली आहे.

पुणे ते कोल्हापूर पुणे ते हुबळी त्या मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहे. तसेच सीएसएमटी ते सोलापूर दरम्यान धावणारी गाडी पुणे मार्गे धावत आहे. आता मात्र पुण्याला चार नवीन गाड्यांची भेट मिळण्याची शक्यता आहे.

यामुळे पुण्यातील वंदे भारत एक्सप्रेसची संख्या 7 होणार आहे. तथापि या संदर्भात भारतीय रेल्वे बोर्डाने कोणताच अधिकृत निर्णय अजून घेतलेला नाही. मात्र लवकरच याबाबत निर्णय होणार अशी शक्यता आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe